मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेचे पालिकेतील सत्ताधारी भाजपा विरोधात खड्डे भरो आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 07:30 PM2020-08-30T19:30:29+5:302020-08-30T19:31:16+5:30

रस्ते बांधणी व दुरुस्तीच्या नावाखाली मीरा भाईंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपा आणि त्यांच्या स्थानिक नेते यांनी प्रश्नाच्या संगनमताने मोठा भ्रष्टाचार चालवला आहे .

Shiv Sena's agitation against ruling BJP in Mira Bhayander | मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेचे पालिकेतील सत्ताधारी भाजपा विरोधात खड्डे भरो आंदोलन 

मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेचे पालिकेतील सत्ताधारी भाजपा विरोधात खड्डे भरो आंदोलन 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड -  मंगळवारी अनंत चतुर्दशी असताना अजूनही मीरा भाईंदर मधील रस्ते खड्ड्यात आहेत . रस्त्यांच्या कामात आणि पॅचवर्क मध्ये सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनाचा मोठा भ्रष्टाचार चालत असल्याचा आरोप करत शिवसेनेने शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवरील खड्डयां विरोधात आंदोलने केली . 

 

रस्ते बांधणी व दुरुस्तीच्या नावाखाली मीरा भाईंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपा आणि त्यांच्या स्थानिक नेते यांनी प्रश्नाच्या संगनमताने मोठा भ्रष्टाचार चालवला आहे . रस्ते व पॅचवर्क ची कामे तांत्रिक निर्देश नुसार होत नसून वापरले जाणारे साहित्य निकृष्ठ दर्जाचे आहे . जेणे करून शहरातील रस्ते अक्षरशः खड्ड्यात गेले आहेत , 

 

सर्वच लहान मोठ्या रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य झाले आहे, शहरातील मुख्य रस्ता असलेला छत्रपती शिवाजी महाराज मार्गाची तर चाळण झालेली आहे .  गेल्यावर्षी मे. ए.आय.सी. इन्फ्रास्ट्रक्चर यांना ३५ कोटी रुपयांना खड्डे बुजविण्याचे कंत्राट दिलेले असून त्याच कंत्राटदाराला आता पालिकेने मुदतवाढ सुद्धा दिल्याचा आरोप शिवसेनेने केलाय . 

 

दरवर्षी पालिका एकीकडे खड्डे बूजविण्याच्या नावाखाली करोडो रुपये खर्च केल्याचा दावा करते तर दुसरीकडे खड्डे मात्र जैसे थे स्थिती झाली आहे. गणरायाचे आगमन व त्याला निरोप देखील भाविकांना खड्यातूनच द्यावा लागला . प्रवाशी व गाडीचालक या खड्ड्यांनी मेटाकुटीला आले आहेत . 

 

भाजपा आणि पालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी शहरात शिवसेनेने ठिकठिकाणी खड्डयां विरोधात आंदोलन केले .  आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, नगरसेवक राजू भोईर, कमलेश भोईर, एलायस बांड्या , नगरसेविका हेलन जॉर्जी, शर्मिला बगाजी,  जिल्हा संघटक स्नेहल सावंत , शहर प्रमुख पप्पू भिसे, शिवशंकर तिवारी , मुस्तफा वनारा , नेहा सिंग, अजित गंडोली,  शिवा सिंह, इरफान खान आदी आंदोलनात सहभागी झाले होते . 

 

शिवसैनिकांनी काही ठिकाणी भाडदे भरो आंदोलन केले . काही ठिकाणी खड्डयां मध्ये रोपांची लागवड केली . तर काही ठिकाणी कागदी होड्या सोडल्या . यावेळी टेंडर आणि टक्केवारीत सत्ताधारी भाजपा व प्रशंसा गुंतले असल्याने शहरातील रस्त्यांचे पार वाटोळे करून टाकले आहे असा आरोप सेनेचे नगरसेवक , पदाधिकारी यांनी केला . 

Web Title: Shiv Sena's agitation against ruling BJP in Mira Bhayander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.