जिल्हा परिषद अध्यक्षपदी शिवसेनेच्या दिपाली पाटील यांची बिनविरोध निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 06:11 PM2019-08-26T18:11:26+5:302019-08-26T18:12:16+5:30

जिल्हा परिषदेचे ५३ सदस्य व पंचायत समितींचे पाच सभापतींची विशेष सभा जिल्हा नियोजन भवनमधील समिती सभागृहात आयोजित केली होती.

Shiv Sena's Dipali Patil elected unopposed as Zilla Parishad president of thane | जिल्हा परिषद अध्यक्षपदी शिवसेनेच्या दिपाली पाटील यांची बिनविरोध निवड

जिल्हा परिषद अध्यक्षपदी शिवसेनेच्या दिपाली पाटील यांची बिनविरोध निवड

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा परिषदेचे ५३ सदस्य व पंचायत समितींचे पाच सभापतींची विशेष सभा जिल्हा नियोजन भवनमधील समिती सभागृहात आयोजित केली होती.

ठाणे : ठाणेजिल्हा परिषद अध्यक्षपदी शिवसेनेच्या दिपाली दिलीप पाटील यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर, त्यांना अध्यक्षपदाची खुर्ची सन्मानपूर्वक देण्यात आली. यावेळी, शिवसेनेचे ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार आणि आमदार पांडुरंग बरोरांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते. नियोजित वेळेप्रमाणे जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदाची निवड 26 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता करण्यात आली आहे. 

जिल्हा परिषदेचे ५३ सदस्य व पंचायत समितींचे पाच सभापतींची विशेष सभा जिल्हा नियोजन भवनमधील समिती सभागृहात आयोजित केली होती. शिवसेनेसाठी हे अध्यक्ष सोडलेले असल्यामुळे या पक्षाच्या एसटी महिला प्रवर्गातील सदस्येची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या जि.प. अध्यक्षांच्या या निवडणुकीसाठी ठाणे उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे ‘पीठासीन अधिकारी’ म्हणून जबाबदारी पार पाडली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाची जिल्हा परिषदेवर सत्ता आहे. सेनेच्या मंजुषा जाधव यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ही जागा रिक्त आहे. या रिक्त अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र देणे व स्विकारण्यात आले होते. त्यानंतर दुपारी ३ वा. नामनिर्देशनपत्रांची छाननी करुन अध्यक्षांची निवड करण्यात आली.

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या (एसटी) महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. यामुळे अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांमधून एसटी महिलेला उमेदवारी दिली जाणार आहे. यासाठी भिवंडी तालुक्यातील वाफे येथील दिपाली पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. त्यानुसार, आज अध्यक्षपदी पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आगामी विधान सभेची निवडणूक लक्षात घेऊन सर्वाधिक सदस्य असलेल्या शिवसेनेने या जिल्हा परिषदेच्या सत्तेत राष्ट्रवादीला उपाध्यक्ष पदासह सभापती पद आधीच दिलेले आहे. याशिवाय भाजपाला काही काळ सत्तेबाहेर ठेवून आता एक सभापती पद दऊन सत्तेत सहभागी करून घेतले. जिल्हा परिषदेत आता विरोधी पक्ष उरलेला नाही. यामुळे सेनेच्या पाटील यांच्या विरोधात कोणी उमेदवारी दाखल करण्याचा धोका पत्करला नाही. 
 

Web Title: Shiv Sena's Dipali Patil elected unopposed as Zilla Parishad president of thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.