लोकसभेसाठी शिवसेनेचे मिशन ठाणे; विधानसभानिहाय बैठकांचा सपाटा सुरु

By अजित मांडके | Published: December 14, 2023 04:51 PM2023-12-14T16:51:25+5:302023-12-14T16:52:40+5:30

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना ठाण्यात कामाला लागली आहे.

Shiv Sena's Mission to Lok Sabha in thane | लोकसभेसाठी शिवसेनेचे मिशन ठाणे; विधानसभानिहाय बैठकांचा सपाटा सुरु

लोकसभेसाठी शिवसेनेचे मिशन ठाणे; विधानसभानिहाय बैठकांचा सपाटा सुरु

अजित मांडके,ठाणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना ठाण्यात कामाला लागली आहे. विधानसभानिहाय बैठकांचा सपाटा सुरु असतांना आता प्रत्येक पदाधिकाºयाला आणि कार्यकर्त्याला कामाला लागण्याचे आदेश बुधवारी ठाण्यात झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या वरीष्ठ पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांना दिले आहेत. सरकारने राबविलेल्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्याबरोबर बुथ लेव्हलला बांधीण करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने हा बालेकिल्ला आपल्याच ताब्यात राहण्यासाठी सर्वांना कामाला लागा असे आदेशच या बैठकीत देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. तसेच ठाण्यात एकसंघ नसलेल्या भाजपला देखील या बैठकींच्या माध्यमातून एक इशाराच दिल्याचेही बोलले जात आहे.


काही दिवसांपूर्वी ठाण्यातील आनंद आश्रम येथे ठाणे, पालघर, कल्याण, भिवंडी येथील पदाधिकाºयांची बैठक घेऊन ठाणे, कल्याणवर भाजप दावा करीत असेल तर भिवंडी सुध्दा आम्ही लढवू असा इशाराच या बैठकीत देण्यात आला होता. त्यानंतर बुधवारी ठाण्यातील माजी नगरसेवक व इतर पदाधिकाºयांची बैठक आनंद आश्रम येथे पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के, माजी महापौर मीनाक्षी शिंदे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत ठाणे लोकसभेबाबत काही महत्वाच्या मुद्यांवर उपस्थितांनी मार्गदर्शन केले. यात लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागा अशा सुचना करण्यात आल्या. ठाणेच नाही तर ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील ठाण्याचेच आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी सर्वांनी तळागळापर्यंत जाऊन काम करण्याच्या सुचनाही यावेळी देण्यात आल्या. काही दिवसांपासून शिवसेनेकडून विधानसभा निहाय बैठका आणि छोटे खानी मेळावे घेतले जात आहेत. नुकतेच ऐरोली आणि बेलापुर विधानसभा मतदार संघात अशाच पध्दतीने बैठक झाली होती. तसेच ठाण्यातील सहा विधानसभा मतदार संघात अशाच पध्दतीने बैठका घेण्याचा सपाटा शिवसेनेकडून लावला गेला आहे. या बैठकीत देखील लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणी करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. तसेच बुधवारी झालेल्या बैठकीत देखील शासनाने आणलेल्या प्रत्येक योजना या जनेपर्यंत नेण्याचे काम करा, मतदारांना काय हवे, त्यांच्या काय समस्या आहेत, त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करा, बुथ लेव्हलला देखील कार्यकर्त्यांची फळी उभारण्याबरोबर त्यांना देखील कामाला लागा असा संदेश देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने प्रत्येक महत्वाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्याच्या खांद्यावर लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काही महत्वाच्या जबाबदाºया देखील टाकण्यात आल्या आहेत.

ठाणे, किंबहुना ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने त्या अनुषंगाने काही झाले तरी लोकसभा आपल्या ताब्यात राहिलीच पाहिजे यासाठी कामाला लागा असा सल्लाही देण्यात आला. ठाण्यात भाजपच्या काही स्थानिक पदाधिकाºयांकडून ठाणे, कल्याणवर वारंवार दावा केला जात आहे. त्यात ठाण्यात भाजपमध्ये आजही कुरघोडीचा राजकारण सुरु असल्याचे चित्र आहे. 

महापालिका क्षेत्रातील माजी नगरसेवकांची व विभाग प्रमुखांची संघटनात्मक बैठक घेण्यात आली होती. यात संघटनात्मक कार्यक्रम तसेच येणाºया लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा करण्यात येऊन प्रत्येक बुथवर कसा लीड घेता येईल या बाबतचा कार्यक्रम देण्यात आला.(नरेश म्हस्के - प्रवक्ता - शिवसेना)

Web Title: Shiv Sena's Mission to Lok Sabha in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.