ठाणे जिल्हा परिषदेत विरोधी पक्षच संपले; अध्यक्ष पदी शिवसेनेच्या पुष्पा बोऱ्हाडे पाटील बिनविरोध 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 05:06 PM2021-05-28T17:06:55+5:302021-05-28T17:07:11+5:30

Thane Politics: शुक्रवारी २८ मे रोजी, आयोगाने ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली आहे.  ५३ सदस्य संख्या असलेल्या या जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे बहुमत आहे. पण या सत्तेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपालाही या सत्तेत सहभागी करुन घेतल्याने येथे एकही विरोधी पक्ष शिल्लक राहिला नाही.

Shiv sena's Pushpa borhade patil is new president of Thane Zilla Parishad | ठाणे जिल्हा परिषदेत विरोधी पक्षच संपले; अध्यक्ष पदी शिवसेनेच्या पुष्पा बोऱ्हाडे पाटील बिनविरोध 

ठाणे जिल्हा परिषदेत विरोधी पक्षच संपले; अध्यक्ष पदी शिवसेनेच्या पुष्पा बोऱ्हाडे पाटील बिनविरोध 

googlenewsNext

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाची निवड आज पार पडली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेच्या उमेदवार पुष्पा बोऱ्हाडे पाटील, यांचाच एकमेव उमेदवारी‌ अर्ज दाखल झाला. त्यांच्या विरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे त्यांचा बिनविरोध  विजयी होण्याचा मार्ग मोकळा झाला आणि त्या बिनविरोध विजयी झाल्या. (Pushpa borhade patil  won Election of Thane Zilla Parishad presidence)

        येथील नियोजन भवनमध्ये ही निवड प्रक्रिया शुक्रवारी पार पाडली. यानिवडणुकीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पिठासन अधिकारी तथा ठाणे उप विभागीय अधिकारी अविनाश शिंदे, यांनी पुष्पा बोऱ्हाडे पाटील, बिनविरोध निवडून आल्याचे घोषीत केले. या आधी लोकमतने 'ठाणे जि.प.अध्यक्ष पदी पुष्पा बोऱ्हाडे पाटील' या आशयाचे वृत्त २३ मे रोजी प्रसिद्ध करुन या विजयाची जाणीव करून दिली होती.‌ शिवसेनेची सत्ता असलेल्या या जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अध्यक्ष सुषमा लोणे,यांनी राजिनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती.

  शुक्रवारी २८ मे रोजी, आयोगाने ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली आहे.  ५३ सदस्य संख्या असलेल्या या जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे बहुमत आहे. पण या सत्तेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपालाही या सत्तेत सहभागी करुन घेतल्याने येथे एकही विरोधी पक्ष शिल्लक राहिला नाही. नगरविकास मंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे, यांनी पुष्पा बोऱ्हाडे पाटील, यांच्या उमेदवारीला हिरवा सिग्नल देताच त्यांच्या विरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष व शिवसेनेचे ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, ठाणे जि.प.चे उपाध्यक्ष सुभाष पवार आदींनी यशस्वी जबाबदारी पार पाडली आहे

          जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला उमेदवारासाठी राखीव आहे. त्यास अनुसरून बोऱ्हाडे, यांची या पदी शिवसेनेने निवड केली आहे. या आधी गेल्या साडेतीन वर्षांत शहापूर, भिवंडी आणि कल्याणला अध्यक्ष पदाचा लाभ मिळालेला आहे. मुरबाडला सुभाष पवार यांच्या रूपाने सध्या उपाध्यक्ष पद आहे. या चार तालुक्यांना न्याय दिल्यानंतर अंबरनाथ तालुक्याला संधी देऊन बोऱ्हाडे,यांना अध्यक्ष पदाची जबाबदारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. अंबरनाथच्या चरगांव गटाचे नेतृत्व बोऱ्हाडे करतात. त्यांच्या अध्यक्ष पदाचा कार्यकाळ अजून दीड वर्षांपेक्षा जास्त शिल्लक आहे.

Web Title: Shiv sena's Pushpa borhade patil is new president of Thane Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.