ओमी यांच्या प्रवेशाला शिवसैनिकांची नकारघंटा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 02:22 AM2019-09-04T02:22:25+5:302019-09-04T02:22:47+5:30
बैठकीत निर्णय : वरिष्ठांना कळविणार
सदानंद नाईक
उल्हासनगर : ऐन निवडणुकीच्या तोंडावर ओमी कालानी यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेला ऊत आला असून शहरातील शिवसैनिकांनी त्यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध केला असल्याची माहिती शहर शिवसेना प्रमुख राजेंद्र चौधरी यांना दिली. शिवसैनिकांच्या भावना वरिष्ठांच्या कानी घालण्याचे संकेत त्यांनी दिले.
भाजपा-शिवसेना युतीचे गुºहाड सुरू असतांना भाजपाकडून माजी आमदार व शहराध्यक्ष कुमार आयलानी यांच्यासह ओमी कालानी, साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी, भाजपाचे गटनेता जमनुदास पुरस्वानी, महेश सुखरामनी, साई पक्षाचे शेरी लुंड व कांचन लुंड असे अनेक जण निवडणूक लढविण्यास इच्छुक असून त्यांनी मुलाखती दिल्या आहेत. तर शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख राजेंद्र चौधरी प्रमुख दावेदार आहेत. राष्ट्वादीकडून आमदार ज्योती कालानी व गटनेता भरत गंगोत्री यांनी मुलाखती दिल्या असून रिपाइं आठवले गटाकडून रिपाइंचे गटनेते भगवान भालेराव यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.
भारिपचे शहराध्यक्ष सुधीर बागुल हेही वंचित आघाडीकडून इच्छुक असून मुलाखत दिली आहे. दरम्यान शिवसेना-भाजपाची युती झाली नाही तर ओमी कालानी हे शिवसेनेकडून निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. शिवसेना व कालानी कुटुंबातील राजकिय संबध म्हणावे तसे चांगले नसून ओमी कालानी यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेला शिवसैनिकांनी सोमवारी बैठक घेऊन विरोध केला आहे. आपण कुठेही शिवसेनेत प्रवेश घेणार, असे म्हटले नाही. तेंव्हा शिवसैनिकांच्या विरोधाला अर्थच राहत नाही, अशी ओमी कालानी यांनी प्रतिक्रीया दिली आहे.