कचरा प्रक्रियेला शिवसेनेचे समर्थन तर महाविकास आघाडीचा विरोध!

By पंकज पाटील | Published: April 6, 2023 06:44 PM2023-04-06T18:44:22+5:302023-04-06T18:46:39+5:30

बदलापूरच्या सामायिक कचरा प्रक्रिया प्रकल्पाला महाविकास आघाडीने विरोध केला आहे.

Shiv Sena's support for waste processing, Mahavikas Aghadi's opposition | कचरा प्रक्रियेला शिवसेनेचे समर्थन तर महाविकास आघाडीचा विरोध!

कचरा प्रक्रियेला शिवसेनेचे समर्थन तर महाविकास आघाडीचा विरोध!

googlenewsNext

बदलापूरबदलापूरच्या सामायिक कचरा प्रक्रिया प्रकल्पाला महाविकास आघाडीने विरोध केला आहे. या प्रकल्पात बदलापूरसह अंबरनाथ आणि उल्हासनगरचाही कचरा आणला जाणार असल्याने महाविकास आघाडीने विरोध दर्शवला असून या प्रकल्पाविरोधात आंदोलनही करण्यात येणार आहे.   

बदलापूर सर्व्हे क्रमांक १८८ या भूखंडावर उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर सामायिक कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार आहे. अशाप्रकारचा हा देशातला पहिलाच प्रकल्प असल्याने आयआयटी सारख्या संस्थेनंही या प्रकल्पाचे कौतुक केले आहे. मात्र या प्रकल्पाला महाविकास आघाडीने अचानक विरोध दर्शवला आहे. याबाबत शुक्रवारी बदलापूरमध्ये महाविकास आघाडीकडून आंदोलनही केले जाणार असल्याची माहिती महाविकास आघाडीच्या बदलापुरातील पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. दुसरीकडे शिवसेना इच्छा असतानाही या प्रकल्पाला विरोध करताना दिसत नाही. संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला विरोध न करता केवळ अंबरनाथचा कचरा थेट बदलापूरच्या डम्पिंग ग्राउंडला टाकण्यास विरोध करीत आहे. 

अंबरनाथच्या डम्पिंगवर हरित लवादाचे ताशेरे 
अंबरनाथच्या चिखलोली परिसरातील सर्व्हे क्रमांक १३२ वर अंबरनाथचं सध्याचं डम्पिंग ग्राउंड आहे. मात्र हे डम्पिंग लोकवस्तीला अगदीच लागून असल्यानं इथल्या रहिवाशांनी थेट राष्ट्रीय हरित लवादाकडे याची तक्रार केली, त्यानंतर हरित लवादाने हे डम्पिंग तातडीनं बंद करण्याचे आदेश दिलेत. यानंतर ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अंबरनाथचा कचरा तात्पुरत्या स्वरूपात बदलापूरच्या सध्याच्या डम्पिंगला टाकण्याचे आदेश दिलेत.

बदलापूरकरांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला विरोध 
जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाला बदलापूरचे शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी विरोध दर्शवला. अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरचा एकत्रित प्रकल्प होईल तेव्हा कचरा आणा, पण आत्ता अंबरनाथचा कचरा बदलापूरला नको, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. सोबतच एकत्रित प्रकल्पाला आमचा विरोध नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या याच भूमिकेचा आता विरोधक फायदा उचलण्याचा प्रयत्न करीत आहेत.

महाविकास आघाडीचा थेट प्रकल्पालाच विरोध
शिवसेनेने सध्याच्या कचऱ्याला विरोध करताच महाविकास आघाडीने हाच मुद्दा पकडला आणि थेट खासदार श्रीकांत शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या सामायिक कचरा प्रक्रिया प्रकल्पालाच विरोध दर्शविला. यामुळे शिवसेनेची मात्र अडचण झाली आहे.

Web Title: Shiv Sena's support for waste processing, Mahavikas Aghadi's opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.