शिवसेनेची कसोटी, श्रमजीवी भाजपासोबत, रूपेश म्हात्रेंनाही धोक्याची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 06:57 AM2017-11-27T06:57:38+5:302017-11-27T06:57:49+5:30

जि. प.च्या निवडणुकीत भिवंडी तालुक्यातील ग्रामीण व भिवंडी पूर्व मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपाने भिवंडी महापालिका निवडणुकीत वापरलेला ‘फोडा आणि राज्य करा’ हाच फॉर्म्युला वापरला आहे.

 Shiv Sena's test, working with BJP, Rupesh Mhatrennaa danger bell | शिवसेनेची कसोटी, श्रमजीवी भाजपासोबत, रूपेश म्हात्रेंनाही धोक्याची घंटा

शिवसेनेची कसोटी, श्रमजीवी भाजपासोबत, रूपेश म्हात्रेंनाही धोक्याची घंटा

Next

- रोहिदास पाटील
अनगाव : जि. प.च्या निवडणुकीत भिवंडी तालुक्यातील ग्रामीण व भिवंडी पूर्व मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपाने भिवंडी महापालिका निवडणुकीत वापरलेला ‘फोडा आणि राज्य करा’ हाच फॉर्म्युला वापरला आहे. भाजपाने श्रमजीवी संघटनेचा पाठिंबा मिळवल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. याचा फटका ग्रामीण मतदारसंघाला बसणार आहेच पण पूर्व मतदारसंघालाही बसणार असल्याने आमदार रूपेश म्हात्रे यांच्यासाठीही धोक्याची घंटा मानली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवेसेनेची खºया अर्थाने परीक्षा आहे.
मागील निवडणुकीत शिवसेनेसोबत श्रमजीवी संघटना असल्याने सेनेचे शांताराम मोरे आमदार म्हणून विजयी झाले. हा विजय भाजपाच्या जिव्हारी लागला. तेव्हापासून खासदार कपिल पाटील यांनी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक माजी आमदार विवेक पंडित यांची भेट घेत चर्चा केली. पुढील होणाºया निवडणुका श्रमजीवीने भाजपासोबत लढवाव्यात यासाठी आग्रह धरला. यासाठी पाटील यांनी वेळोवेळी मुख्यमंत्री आणि पंडित यांच्या भेटी घडवून आणल्या. अखेर आदिवासींच्या समस्या भाजपाच सोडवू शकतो, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून पंडित यांना देण्यात पाटील यांची सरशी झाली. संघटनेच्या पाठिंब्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा भाजपाला होणार आहे.
भिवंडी तालुक्यात जिल्हा परिषदेचे २१ गट आणि पंचायत समितीचे ४२ गण आहेत. सर्वाधिक सदस्य भिवंडीतून निवडून जाणार असल्याने जि. प.चा अध्यक्ष कोणत्या पक्षाचा होणार हे भिंवडी तालुका ठरवणार आहे. भिवंडी महापालिकेत निवडणुकीनंतर काँग्रेसच्या मदतीला शिवसेना धावल्याने जि. प. निवडणुकीत काँग्रेस सेनेसोबत राहील असे संकेत होते. मात्र काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुरेश टावरे यांनी दिली. यामुळे सेनेला आणखी एक धक्का बसला आहे. तर सेनेने सत्तेची गणिते जुळवण्यासाठी आरपीआय सेक्युलरचे श्यामदादा गायकवाड यांच्यासोबत हातमिळवणी करून भाजपाला शह देण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजपाने श्रमजीवी संघटनेला जि.प.चे दोन गट तर पंचायत समितीच्या चार जागा दिल्या आहेत. तर शिवसेनेने राष्ट्रवादीला जि.प.च्या दोन व दोन पंचायत समितीची उमेदवारी जाहीर केली आहे. तर आघाडीमधून काडीमोड घेणाºया मनसेने मात्र पडघा जि.प. गटात सेनेशी युती करून एक पंचायत समितीचा गण पदरात पाडत पाठिंबा दिला आहे. तर या निवडणुकीत भाजपाच्या जुन्या पदाधिकाºयांना उमेदवारी नाकारून नव्या भाजपावाल्यांना उमेदवारी दिल्याने नाराजी आहे. त्याचा फटका भाजपा उमेदवारांना बसू शकले अशी अटकळ बांधली जात आहे.
श्रमजीवीने काडीमोड घेतल्याने शिवसेनेत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीत लक्ष घातल्याने कार्यकर्ते कामाला लागले आहेत. सेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, संपर्कप्रमुख सुरेश म्हात्रे, सहसंपर्कप्रमुख देवानंद थळे, तालुकाप्रमुख विश्वास थळे, तालुका संर्पकप्रमुख कुंदन पाटील, कृष्णकांत कोंडलेकर, पंडित पाटील, प्रभूदास नाईक, राजू चौधरी, प्रवीण पाटील, विष्णू चंदे, नीलेश गंधे, किरण चन्ने, राष्ट्रवादीचे इरफान भुरे, गणेश गुळवी हे कामाला लागले आहेत. तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे, तालुकाध्यक्ष पी. के. म्हात्रे, मोहन अंधेरे, देवेश पाटील, श्रीकांत गायकर, नारायण पाटील, दयानंद पाटील, संघटनेचे बाळाराम भोईर, दत्तात्रेय कोलेकर, अशोक सापटे, प्रमोद पवार, संगीता भोमटे, जया पारधी हे रिंगणात आहेत.

श्रमजीवी संघटना सोबत असती तर निवडणुकीत चित्र बदलायला नक्कीच मदत झाली असती. या संबंधी संघटनेचे संस्थापक विवेक पंडीत यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. शिवसैनिक कामाला लागले असून विजय एकाधिरशहाशीचा होतो की सत्याचा हे मतदार ठरवतील.
- प्रकाश पाटील,
ग्रामीण जिल्हापमुख, शिवसेना

श्रमजीवी संघटना आदिवासी व गरीबांच्या हक्कासाठी अनेक वर्षांपासून लढत आहे. कुपोषण, रोजगार, आरोग्य, शिक्षण, कामगारांचे प्रश्न सुटलेले नाहीत. ते सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देण्याचे संघटनेने एकमताने ठरवले आहे.
- विवेक पंडित,
संस्थापक, श्रमजीवी संघटना.

Web Title:  Shiv Sena's test, working with BJP, Rupesh Mhatrennaa danger bell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.