'शिवाजी महाराजांवरील पुस्तकावर बंदी घाला, लेखकाला अटक करा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 02:09 AM2020-02-21T02:09:09+5:302020-02-21T02:09:18+5:30

निरंजन डावखरे : लेखकाला अटक करा

'Shivaji Maharaj ban book, arrest author' | 'शिवाजी महाराजांवरील पुस्तकावर बंदी घाला, लेखकाला अटक करा'

'शिवाजी महाराजांवरील पुस्तकावर बंदी घाला, लेखकाला अटक करा'

Next

ठाणे : महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांवर अपमानजनक, आक्षेपार्ह आणि दर्जाहीन लिखाण असलेले ‘शिवाजीचे उदात्तीकरण : पडद्यामागचे वास्तव’ या पुस्तकावर तातडीने बंदी घालून लेखक डॉ. विनोद अनाव्रत व प्रकाशकाला त्वरित अटक करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आमदार तथा भाजपचे शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केली असून तसे निवेदन गुरुवारी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिले.

या पुस्तकातील जवळजवळ प्रत्येक वाक्यागणिक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून दूषणे देण्यात आल्याचा शिवप्रेमी जनतेचा आरोप असल्याचेही त्यांनी निदर्शनात आणून दिले आहे. या वादग्रस्त पुस्तकाचे शीर्षकच आक्षेपार्ह आहे. संपूर्ण पुस्तकातील शीर्षके व उपशीर्षकांमध्ये महाराजांविषयी तुच्छताभाव दाखवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. हा अवमान महाराष्ट्रातील जनता कदापि सहन करणार नाही. या पुस्तकातील तब्बल ६० पाने ‘रयतेचा खरा राजा कोण : शिवाजी की औरंगजेब’ या प्रकरणावर खर्ची घालून, औरंगजेबला महान दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. या पुस्तकातील उतारे काही विशिष्ट मंडळींकडून सोशल मीडियावर वेगाने प्रसारित केले जात आहेत.

आंदोलनाचा इशारा
च्अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आम्हाला मान्य आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही. या पुस्तकावर बंदी न आल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू. समाजमाध्यमांवर बदनामी करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणीही केली आहे.

Web Title: 'Shivaji Maharaj ban book, arrest author'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे