सोशल मीडियावर शिवसेनेचा भर कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 12:17 AM2019-04-19T00:17:32+5:302019-04-19T00:17:58+5:30

सध्या इंटरनेटचा जमाना असल्याने व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आदींच्या माध्यमातूनही ठाणे लोकसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे.

Shivsena's emphasis on social media is lacking | सोशल मीडियावर शिवसेनेचा भर कमी

सोशल मीडियावर शिवसेनेचा भर कमी

Next

ठाणे : सध्या इंटरनेटचा जमाना असल्याने व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आदींच्या माध्यमातूनही ठाणे लोकसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. त्यासाठी शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांची वॉर रूम सज्ज झाली आहे. तेथून फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपद्वारे सध्या टप्याटप्याने प्रचार सुरू आहे. विचारे यांच्या आॅफिशल फेसबुक पेजला २८ हजार ६३२ जणांनी फॉलो केले आहे. परंतु, सोशल मीडियावर जसा जोमात प्रचार होणे अपेक्षित आहे, तसा अद्याप शिवसेनेकडून होत नसल्याचे पाहायला मिळते.
तरुण मतदारांचा टक्का हा ठाणे लोकभा मतदारसंघात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. तीन लाखांहून अधिक मतदार हे तरुण मतदार असून त्यांची मते ही निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. यासाठी वॉर रुम सज्ज झाली आहे. मागील काही दिवसांपासून या रूममधून सोशल मीडियावर विचारे यांचा प्रचार सुरु झाल्याचे दिसत आहे.
विचारे यांचे आॅफीशली फेसबुक पेज असून, त्यावर दररोज ५ च्या आसपास पोस्ट सध्या टाकल्या जात आहेत. तेवढ्याच प्रमाणात व्हिडीओही पोस्ट केले जात आहेत. त्याला दररोज सुमारे चार हजारांच्या आसपास लाइक्स मिळत आहेत. तर रॅली, चौकसभांच्या फोटांना सुमारे ४०० पर्यंत लाइक्स मिळत आहेत.
>कशी चालते यंत्रणा?
सोशल मीडियाच्या वारॅरुममध्ये आठ ते दहा तरुण काम करीत आहेत. रोजच्या रोज कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून अपडेट केला जात आहे.
फेसबुक पेज अपडेट ठेवणे, व्हॉट्सअ‍ॅपला पोस्ट टाकणे ते शेअर करण्यासाठी इतरांना सांगणे.
उमेदवाराचे व्हिडीओ तयार करणे, मतदारांचा डाटा तयार करणे, रोजच्या प्रचार रॅली, चौकसभा आदींची माहिती प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचविणे, प्रतिस्पर्धी उमेदवाराने टीका केल्यास त्याचे उत्तरही सोशल मीडियाद्वारे देणे आदी कामे सुरू आहेत.
>500 लाइक्स शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांच्या फेसबुक पेजला आहेत. त्यांच्या पेजवरून रोज चार ते पाच पोस्ट टाकल्या जातात. दररोजच्या दौऱ्यांचे अपडेट्सही दिले जातात. 4,050 जणांना विचारे यांच्या वॉर रूमच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅपच्या पोस्ट रोज पाठवल्या जातात. त्यातील अनेक कार्यकर्ते या पोस्ट नंतर व्हायरल करतात.

Web Title: Shivsena's emphasis on social media is lacking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.