मेट्रोसाठी शिवसेनेचे जनआंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 02:40 AM2018-08-18T02:40:21+5:302018-08-18T02:40:31+5:30

मेट्रोसाठी शिवसेनेसह नागरिकांनी आंदोलने केली असताना मेट्रोला मंजुरी दिल्याचे जाहीर करून स्थानकांची नावेही मंजूर झाली आहेत. असे असताना कामाला सुरुवात झाली नसल्याने सरकारने मीरा- भार्इंदरकरांची फसवणूक केली आहे.

Shivsena's mass movement for Metro | मेट्रोसाठी शिवसेनेचे जनआंदोलन

मेट्रोसाठी शिवसेनेचे जनआंदोलन

Next

मीरा रोड - मेट्रोसाठी शिवसेनेसह नागरिकांनी आंदोलने केली असताना मेट्रोला मंजुरी दिल्याचे जाहीर करून स्थानकांची नावेही मंजूर झाली आहेत. असे असताना कामाला सुरुवात झाली नसल्याने सरकारने मीरा- भार्इंदरकरांची फसवणूक केली आहे. त्यामुळे मेट्रोचे काम सुरू होत नाही, तोपर्यंत दहीहंडीपासून टप्प्पाटप्प्याने पाच जनआंदोलने करण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले आहे.
दहिसरची मेट्रो मीरा-भार्इंदरमध्ये आणण्यासह ती मेट्रो ठाण्याला जोडावी, अशी सतत मागणी शिवसेनेने सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने करतानाच अधिवेशनात विविध मार्गांनी हा मुद्दा मांडला. मेट्रोला मंजुरी दिल्याचे जाहीर करून तसेच स्थानकांचे नामकरण करूनही काम सुरू होत नसल्याने आपण एमएमआरडीएचे अतिरिक्तआयुक्त प्रवीण दराडे यांची भेट घेऊन निवेदन दिले व चर्चा केली आहे. मीरा-भार्इंदर मेट्रोच्या कामासाठी आर्थिक तरतूद करावी व निविदा काढून येत्या डिसेंबरपर्यंत काम सुरू करावे, असे निवेदनात म्हटले आहे. मीरा- भार्इंदर मेट्रोचा सुमारे चार हजार ४०० कोटींचा प्रकल्प आराखडा तयार आहे. मेट्रो प्रकल्पांसाठी ७० हजार कोटींचे कर्ज मंजूर असल्याने आर्थिक तरतूद नसली, तरी काम सुरू करायला अडचण नसल्याचे सरनाईक म्हणाले.
दहिसर पूर्व ते मीरा-भार्इंदरपर्यंतचे मेट्रोचे काम सुरू न करून सरकारने फसवणूक केली असल्याने शिवसेना आंदोलन करणार आहे.

लाँग मार्च काढण्याचा इशारा
दहीहंडीनिमित्त शिवसैनिक हे आम्हाला मेट्रो हवी, अशी मागणी करणारे टी-शर्ट घालून दहीहंडी फोडण्यासाठी थर रचतील. गणेशोत्सवात मेट्रोच्या मागणीसाठी शिवसेना सार्वजनिक महाआरत्या करणार आहे. नवरात्रीत शहरातील प्रमुख चौकांमध्ये महिला शिवसैनिक या मेट्रोचे काम सुरू करा, म्हणून गरबा खेळणार आहेत. तर, दिवाळीमध्ये सेनेच्या शाखा, सार्वजनिक नाके, इमारती येथे मेट्रोचे काळे कंदील लावले जातील. त्यानंतरही मेट्रोचे काम सुरू केले नाही, तर शहरात जनआंदोलन उभे करून एमएमआरडीएच्या कार्यालयावर लाँग मार्च काढला जाणार असल्याचे आ. सरनाईक यांनी म्हटले.

Web Title: Shivsena's mass movement for Metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.