सत्तेसाठी शिवसेनेचा अट्टहास
By admin | Published: October 14, 2015 02:29 AM2015-10-14T02:29:57+5:302015-10-14T02:29:57+5:30
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आधीच्या सत्ताधारी पक्षांचे कार्यकर्ते सर्रासपणे शिवसेना-भाजपात प्रवेशकर्ते झाले. कल्याण-डोंबिवलीत तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक यासाठीच सेना भाजपात गेले आहेत.
अरविंद म्हात्रे, चिकणघर
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आधीच्या सत्ताधारी पक्षांचे कार्यकर्ते सर्रासपणे शिवसेना-भाजपात प्रवेशकर्ते झाले. कल्याण-डोंबिवलीत तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक यासाठीच सेना भाजपात गेले आहेत.
स्वबळावर ही निवडणूक लढत असल्याने फार कष्ट न करताच बहूमता इतके नगरसेवक सेनेला मिळू शकतील आणि महापौर पद मिळविण्याची इच्छापूर्ती होईल अशी सेनेची अटकळ आहे. असे असले तरी शिवसेनेने २७ गावांतून उमेदवारी दिली तर संघर्ष समिती एकास एक उमेदवार देण्याच्या तयारीत लागली आहे. बहिष्काराच्या मुद्यावर समिती आक्रमक झाली आहे.
(वार्ताहर)
भाजपा स्वबळावर
भाजपा आणि शिवसेनेसुद्धा या नगरसेवकांना तिकिटांची कमिटमेंट करून पक्षात प्रवेश दिला. हे सर्व भाजपा आणि सेनेच्या आपापसातील सत्तेच्या अट्टहासामुळे अधिक घडते आहे. लोकसभा आणि विधानसभेत मिळालेल्या यशामुळे भाजपा हुरळून गेला असून सर्वच निवडणुका स्वबळावर लढवणार आहे.
याचीच री कल्याण -डोंबिवली मनपा निवडणुकीत ओढली गेली असून मागची युती संपुष्टात आणली गेली. ती सत्तेच्या अट्टाहासासाठीच कोणत्याही परिस्थितीत कडोंमपामध्ये महापौर आपलाच करायचा असा चंग भाजपाने बांधल्याचा धसका पंधरा वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेनेने घेतला असल्यानेच २७ गावांतून बहिष्काराला साथ न देता निवडणूक लढवून २१ प्रभागांतून सहजच नगरसेवक पदरात पाडण्याच्या प्रयत्नात सेना आहे.
याआधीच राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे, भाजपा, समाजवादी पार्टी, आरपीआय आदी पक्षाने बहिष्काराला पाठिंबा दिला. मात्र डोंबिवली आणि कल्याण पश्चिममध्ये मनपाप्रमाणे यश मिळणार नसल्याचा संशय बळावल्याने सेनेला २७ गावांतून विरोधाचा सामना करावा लागेल.