महावितरणच्या वाढीव वीजबिलाचा सुमारे पाच लाख ग्राहकांना शॉक
By admin | Published: December 8, 2015 12:50 AM2015-12-08T00:50:55+5:302015-12-08T00:50:55+5:30
आधीच वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कबंरडे मोडल्याने तो हैराण झाला असतांनाच महावितरणने या सर्वसामान्य सुमारे पाच लाख ग्राहकांना अचानक २० टक्के वाढीव बिलाचा शॉक दिला आहे
अजित मांडके, ठाणे
आधीच वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कबंरडे मोडल्याने तो हैराण झाला असतांनाच महावितरणने या सर्वसामान्य सुमारे पाच लाख ग्राहकांना अचानक २० टक्के वाढीव बिलाचा शॉक दिला आहे. अचनाक बिलात ७०० ते २००० पर्यंतची वाढ कशी झाली असा सवाल आता हे सर्वसामान्य ग्राहक करु लागले आहेत. त्यामुळे हे वाढीव बिल कमी करण्यासाठी ग्राहकांनी महावितरणचे दरवाजे ठोठावण्यास सुरवात केली असून त्यांच्या पदरी मात्र निराशाच पडत आहे.
मागील महिन्यात ज्या ग्राहकाला १२०० रुपये बिल येत होते, त्यांना अचानक या महिन्यात २ हजार पर्यंतचे बिल आले आहे. अशीच परिस्थिती व्यवसायीक ग्राहकांची देखील असून त्यांनाही महावितरणचा शॉक बसला आहे. हे बील आॅक्टोबर महिन्यातील असून, आधीच आॅक्टोबर हीटमुळे हैराण झालेल्या आणि वारंवार वीज पुरवठा या महिन्यात खंडीत झाल्यानंतरही सर्वसामान्य ग्राहकांच्या हाती अशा प्रकारे वाढीव बिल आल्याने ते चांगलेच संतापले आहेत. या संदर्भात अनेक ग्राहक महावितरणच्या विविध कार्यालयात खेपा घालत आहेत. मात्र त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली आहेत. आधी बिल भरा, अर्ज करा नंतर तुमच्या बिलाचे बघु अशीही उत्तरे ग्राहकांना मिळत आहेत. परंतु अचानक, आलेल्या वाढीव बिलाचे कारण काय? याचेही धड उत्तर त्यांना मिळत नाही.
असे वाढले बिल...
महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, त्यांनी सांगितले की इंधनात १ रुपयांची, टेरीफमध्ये जून मध्ये बदल करण्यात आले आहेत. परंतु त्याचे परिपत्रक उशिराने हाती पडल्याने, जून महिन्याची थकबाकी आणि टॅक्स आॅन सेल लावला गेल्याने एकूण साधारणपणे
काही ग्राहकांना ३२ दिवसांचे बिल
काही ग्राहकांना एक महिन्याचे म्हणजेच ३० ऐवजी ३२ दिवसांचे बील
गेले आहे. ठेकेदारकडून रेडींग चुकीच्या दिवशी घेतले गेल्यानेच असा प्रकार घडल्याचे महावितरणचे मत आहे. परंतु पुढील महिन्याच्या बिलात २८ दिवसांचे बील येईल असा दावा महावितरण करीत आहे.