साडेतीन लाख ग्राहकांना शॉक!

By admin | Published: March 23, 2016 02:10 AM2016-03-23T02:10:35+5:302016-03-23T02:10:35+5:30

महावितरणे भांडुप परिमंडळाअंतर्गत ४०१ कोटींची वीज थकबाकी न भरणाऱ्या तीन लाख ४६ हजार ३०५ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे

Shock to three and a half million customers! | साडेतीन लाख ग्राहकांना शॉक!

साडेतीन लाख ग्राहकांना शॉक!

Next

ठाणे : महावितरणे भांडुप परिमंडळाअंतर्गत ४०१ कोटींची वीज थकबाकी न भरणाऱ्या तीन लाख ४६ हजार ३०५ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. यात ठाणे, नवी मुंबईतील ग्राहकांचा प्रामुख्याने समावेश आहे. या वीजचोरांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती भांडुप नागरी परिमंडळाचे मुख्य अभियंता सतीश करपे यांनी दिली.
कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांकडील थकबाकी वसुली संदर्भात नुकतीच भांडुप परिमंडळामध्ये अधिकारी तसेच सर्व वीज कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी यांची त्यांनी बैठक घेतली. अनेक महिन्याची वीज देयक थकबाकी न भरल्यास त्या वीजग्राहकाचा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. अशाप्रकारे वीजपुरवठा खंडित केलेले ग्राहक महावितरणच्या डोळयात धूळफेक करून चोरून अथवा शेजाऱ्याच्या मीटर मधून वीजजोडणी घेवून वीज वापरत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे या प्रकारास आळा घालणे आणि मोठया प्रमाणावर थकीत असलेल्या वीज देयक थकबाकीची वसुली करण्यासाठी कर्मचारी व कर्मचारी संघटनांचे पदाधिकाऱ्यांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर शोध मोहिम हाती घेतली असल्याचे करपे यांनी या बैठकीत सांगितले.
थकबाकी न भरता वीज वापरणाऱ्या ग्राहकांनी त्वरित आपली थकबाकी भरावी. तसेच वीजदेयकाबाबत काही शंका असल्यास ग्राहक सुविधा केंद्र, ठाणे येथे तर वाशी मंडळातील वीज ग्राहकांनी मंडळ कार्यालयातील ग्राहक सुविधा केंद्र येथे संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Shock to three and a half million customers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.