शॉक लागून कामगाराचा मृत्यू
By admin | Published: July 8, 2017 05:31 AM2017-07-08T05:31:44+5:302017-07-08T05:31:44+5:30
तालुक्यातील धानिवली येथील टेक्नोक्राफ्ट कंपनीत वीजेचा शॉक लागल्याने एका कामगाराचा शुक्रवारी मृत्यू झाला. तर दुसऱ्या एका
लोकमत न्यूज नेटवर्क
मुरबाड : तालुक्यातील धानिवली येथील टेक्नोक्राफ्ट कंपनीत वीजेचा शॉक लागल्याने एका कामगाराचा शुक्रवारी मृत्यू झाला. तर दुसऱ्या एका घटनेत शिवळे येथील नदी किनारी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे औद्योगिक क्षेत्र आणि पोलीस सुरक्षा यंत्रणा ऐरणीवर आला आहे.
मुरबाड औद्योगिक क्षेत्रातील कंपनी मालकांच्या हलगर्जीपणामुळे आणि निष्काळजीपणामुळे औद्योगिक कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास धानिवली येथील टेक्नोक्राफ्ट कंपनीतील मयूर शांताराम तरे (१९) या तरुणाचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाला.
कंपनीचे मालक कामगारांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा पुरवत नसल्याने कामगारांचे जीवन धोक्यात आले आहे. गेल्या तीन महिन्यांत सात-आठ कामगारांना जीव गमवावा लागला आहे. मात्र, कंपनी मालकांना याचं काडीचंही सोयर सुतक नाही.
दरम्यान, कल्याण -नगर रोडवरील शिवळे गावाच्या हद्दीत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. मुरबाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अजय वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक चिंबडा आणि पो. हवालदार गुंड याचा तपास करत आहेत. कंपनी व्यवस्थापनाने सुरक्षिततेच्यादृष्टीने पावले उचलावीत अशी मागणी कामगारांकडून केली जात आहे.