ठाण्यातील अरविंद जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शोकसभा, विविध मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 05:20 PM2017-12-04T17:20:16+5:302017-12-04T17:28:24+5:30

अरविंद जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रश्मी जोशी व परिवार आणि व्यास क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने शोकसभेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी लिहीलेल्या पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्यात आले.

Shocked by the memorial of Arvind Joshi in Thane, Vahilly Tribute to various dignitaries | ठाण्यातील अरविंद जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शोकसभा, विविध मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

ठाण्यातील अरविंद जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शोकसभा, विविध मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

Next
ठळक मुद्देअरविंद जोशी यांना आदरांजलीव्यास क्रिएशन्सतर्फे शोकसभा आयोजितअरविंद जोशी यांनी लिहीलेले ० ते + ६ आणि ० ते - ६ या पुस्तकाचे प्रकाशन

ठाणे: आधाररेखा संस्थेचे संस्थापक आणि ठाण्यातील विविध संस्थांचे सक्रीय कार्यकर्ते अरविंद जोशी हे आपल्या मनमिळावू स्वभावामुळे ठाणेकरांच्या आठवणीत सदैव राहतील. ज्या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्यात पुढाकार घेतला, त्यांचे कार्य धडाडीने पुढे नेणे हीच त्यांना खरी मानवंदना ठरेल अशा शब्दांत अरविंद जोशी यांना आदरांजली वाहण्यात आली. व्यास क्रिएशन्सतर्फे हि शोकसभा आयोजित केली होती 
        कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे प्रणेते, आधाररेखा संस्थेचे संस्थापक आणि लेखक अरविंद जोशी यांचा रविवारी उमा निळकंठ हॉल येथे स्मृती वंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अरविंद जोशी यांचा मित्रपरिवार बहुसंख्येने उपस्थित होता. यावेळी व्यास क्रिएशन्सच्यावतीने अरविंद जोशी यांनी लिहीलेले ० ते + ६ आणि ० ते - ६ या पुस्तकाचे प्रकाशन रश्मी जोशी, कुलभूषण जोशी आणि व्यास क्रिएशन्सचे संचालक निलेश गायकवाड यांच्या हस्ते झाले. जिज्ञासा ट्रस्टचे सुरेंद्र दिघे यांनी त्यांच्या आठवणी सांगून सभेला सुरूवात केली. गायकवाड यांच्यासह आचार्य अत्रे कट्टा सांस्कृतिक मंडळातर्फे संपदा वागळे, गीता जोशी, विनायक जोशी, वाचक मंडळातर्फे सुरेश जांभेकर, वनवासी कल्याण आश्रमातर्फे जयश्री आंबेकर, कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे सुषमा हिप्पळगावकर, गुणेंद्र फणसळकर, मंगल घाणेकर, मायबोली साहित्य मंडळातर्फे स्वाती चव्हाण, आधाररेखा योग विभागातर्फे जयश्री शुक्ल, सीकॉमचे सोहोनी, अरविंद जोशी यांचे कॉलेज मित्र सी.ए. चंद्रशेखर वझे आदींनी त्यांच्या स्वभावाचे अनेक पैलू आपल्या मनोगतातून मांडले. मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष ह. शा. भानुशाली यांनीही त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, अरविंद जोशी केलेले कॅन्सर रुग्णांसाठी केलेले कार्य आणि प्रचार यावर विशेष पैलु टाकला. तसेच, जोशी परिवारातर्फे प्रा. दिलीप फडके यांनीही आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. त्यांचे सर्व कार्यातील व्यवस्थापन, सर्व कामात रस घेऊन सर्व उपक्रमात रस घेणे हा त्यांचा स्वभावविशेष होता. सर्व संस्था आपापल्या नेतृत्वावर उभे राहण्यासाठी त्यांनी पुर्वीच नियोजन केले होते. त्यांची दुरदृष्टी नेहमीच निदर्शनास येत असे. त्यांचे कार्य निरंतर चालू ठेवण्याची ग्वाही यावेळी सर्व संस्थांनी दिली.

 

Web Title: Shocked by the memorial of Arvind Joshi in Thane, Vahilly Tribute to various dignitaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.