धक्कादायक! ठाण्यात अवघ्या पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 21:11 IST2020-01-21T21:03:33+5:302020-01-21T21:11:39+5:30
ठाण्यातील लोकमान्यनगर येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दिनेश सुतार याला वर्तकनगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे.

वर्तकनगर पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : लोकमान्यनगर येथील एका साडे चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणा-या दिनेश सुतार याला वर्तकनगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. त्याला २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
लोकमान्यनगर भागात राहणारी ही पिडित मुलगी तिच्या घरासमोर १९ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास खेळत होती. त्यावेळी त्याच भागात राहणाºया दिनेशने तिला खेळण्याचे अमिष दाखवून आपल्या घरी नेले. तिथे तिच्याशी त्याने लैंगिक चाळे केले. आपल्यावरील आपबिती तिने आई वडिलांना सांगितली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या तिच्या आई वडिलांनी याप्रकरणी २१ जानेवारी रोजी पहाटे त्याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचार तसेच लहान मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण या कलमांखाली वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर आव्हाड यांच्या पथकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासांमध्ये कथित आरोपी दिनेशला अटक केली.