धक्कादायक! ठाणे आरटीओ कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाºयास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 09:04 PM2021-01-21T21:04:52+5:302021-01-21T21:09:32+5:30

प्रादेशिक परिवहन कार्यालयातील चार ते पाच महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग करणा-या शरद धुमाळ (३५) या राष्ट्रीय मानव हक्क संघाच्या कथित अध्यक्षाला वागळे इस्टेट पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे.

Shocking! Arrested for molesting a female employee of Thane RTO office | धक्कादायक! ठाणे आरटीओ कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाºयास अटक

वागळे इस्टेट पोलिसांची कारवाई

Next
ठळक मुद्देवागळे इस्टेट पोलिसांची कारवाईमहिलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचेही केले छुप्या रितीने चित्रण

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : प्रादेशिक परिवहन कार्यालयातील चार ते पाच महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग करणा-या शरद धुमाळ (३५) या राष्ट्रीय मानव हक्क संघाच्या कथित अध्यक्षाला वागळे इस्टेट पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो येथील महिलांना माहिती अधिकार कायद्याच्या नावाखाली त्रास देत असल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
भिवंडी येथे वास्तव्याला असलेल्या धुमाळ याने माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याच्या नावाखाली ठाणे आरटीओ कार्यालयातील काही महिला कर्मचा-यांकडे पाहून अश्लील शेरेबाजी तसेच हावभाव केले होते. याशिवाय, त्याने विविध अधिकारी आणि कर्मचारी यांची वैयक्तिक माहिती माहितीच्या अधिकारामध्ये मागवून त्यांच्याही खोटया तक्रारी करीत या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचा-यांवर दबावतंत्र आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. वारंवार त्याच्याकडून होणाºया त्रासाला कंटाळून येथील एका महिला कर्मचा-याने अखेर धाडस दाखवून त्याच्याविरुद्ध ५ जानेवारी २०२१ रोजी तक्रार दाखल केली. याची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैशाली रासकर यांच्या पथकाने त्याला २० जानेवारी रोजी अटक केली. विशेष म्हणजे २०१५ मध्ये या कार्यालयात महिलांनी केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा एक व्हिडिओ त्याने छुप्या कॅमे-याने चित्रित केला होता. त्यात एक गाणे संपादित करुन कोरोना काळात म्हणजे २०२० मध्ये या महिलांनी कार्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम केल्याची तक्रार त्याने परिवहन आयुक्तांकडे केली होती. त्यामुळे महिला कर्मचा-याच्या निलंबनाच्या मागणीचाही त्याने तगादा लावला होता. अशाच प्रकारे त्याने इतरही महिला कर्मचा-यांना माहिती अधिकाराच्या नावाखाली त्रास दिल्याची तसेच त्यांचाही वेगवेगळया प्रकारे विनयभंग केल्याच्या तक्रारी अन्य चार महिलांनी केल्याचीही माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी दिली. या संपूर्ण प्रकरणाची आरटीओच्या विशाखा समितीकडेही या महिलांनी तक्रार केली होती. या समितीच्या सुनावणीलाही तो गैरहजर राहत असे. अखेर त्याच्याविरुद्ध या महिलांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Shocking! Arrested for molesting a female employee of Thane RTO office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.