धक्कादायक! शीतपेयामध्ये गुंगीचे औषध देऊन महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक
By जितेंद्र कालेकर | Published: May 22, 2021 12:37 AM2021-05-22T00:37:07+5:302021-05-22T00:39:52+5:30
शीतपेयामध्ये गुंगीचे औषध देऊन एका २४ वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार करणाºया जाफर शेख या बांधकाम व्यावसायिकाला नौपाडा पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. त्याला २५ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: शीतपेयामध्ये गुंगीचे औषध देऊन एका २४ वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार करणाºया जाफर शेख या बांधकाम व्यावसायिकाला नौपाडा पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. त्याला २५ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. कहर म्हणजे कुठे तक्रार केली तर तिच्यासह मुलीलाही ठार मारण्याची धमकी त्याने दिली होती.
नवी मुंबईतील वाशी परिसरात राहणाºया या पिडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार २ मे २०२१ रोजी दुपारी २.५० वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील जाफर शेख याच्या कापूरबावडी येथील कार्यालयात दुकान खरेदी खताची बोलणी करण्यासाठी तसेच नोंदणी करार करण्यासाठी जाफर याने तिला बोलविले होते. तिथे तिच्या शीतपेयामध्ये गुंगीचे औषध टाकून ते तिला पिण्यासाठी त्याने दिले. ते प्यायल्यानंतर ती त्याठिकाणी बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला विवस्त्र करुन त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या घृणास्पद प्रकाराचा त्याने व्हिडिओ बनवून तिच्यावर पुन्हा लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. याची कुठेही तक्रार केली किंवा वाच्यता केली तर तिच्यासह तिच्या मुलीलाही ठार मारण्याची धमकी देऊन हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकीही त्याने दिली. या प्रकारानंतर प्रचंड भेदरलेल्या या महिलेने अखेर १९ मे २०२१ रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली. याची गांभीर्याने दखल घेऊन सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्या पथकाने त्याला १९ मे रोजी अटक केली.