धक्कादायक! ठाण्यातील वकीलाच्या विरुद्ध चोरीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 12:00 AM2020-11-05T00:00:42+5:302020-11-05T00:03:58+5:30

एरव्ही, आरोपींना नोटीस बजावणाऱ्या ठाण्यातील कोपरी येथील वकील दिलीप आसवानी यांच्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात २२ हजारांच्या दोन इलेक्ट्रॉनिक बे्रकर मशिन चोरीचा गुन्हा मंगळवारी दाखल झाला आहे. या मशिनही आसवानी यांच्या घरातून त्यांच्या मुलाच्या साक्षीने कोपरी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

Shocking! A case of theft against a lawyer in Thane | धक्कादायक! ठाण्यातील वकीलाच्या विरुद्ध चोरीचा गुन्हा

कोपरी पोलिसांनी बजावली नोटीस

googlenewsNext
ठळक मुद्देघरातूनच मिळाला चोरीतील मुद्देमालकोपरी पोलिसांनी बजावली नोटीस

जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: एरव्ही, पक्षकारांना नोटीस बजावणाºया ठाण्यातील कोपरी येथील वकील दिलीप आसवानी यांच्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात २२ हजारांच्या दोन इलेक्ट्रॉनिक बे्रकर मशिन चोरीची तक्रार मंगळवारी दाखल झाली आहे. विशेष म्हणजे तक्रारदाराच्या संशयावरुन या मशिनही आसवानी यांच्या घरातून त्यांच्या मुलासमोरच कोपरी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोपरी येथील सुमारे ४० वर्षे जुनी असलेल्या लाल महाल या तळ अधिक तीन मजली इमारतीमध्ये तिसºया मजल्यावर अ‍ॅड. आसवानी यांचे घर आहे. आसवानी यांचे आणि इमारतीमधील रहिवाशांमध्ये इमारतीच्या दुरुस्तीवरुन गेल्या काही दिवसांपासून वाद आहेत. सध्या इमारत दुरुस्तीच्या कामाचा ठेका सिद्धेश पिंगुळकर यांना दिलेला आहे. १ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी ४.१५ ते ३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान लाल महाल इमारतीच्या मीटर बॉक्समध्ये ठेवण्यात आलेले २२ हजारांचे दोन इलेक्ट्रॉनिक ब्रेकर मशिन चोरीस गेले. हे मशिन आसवानी यांनीच चोरुन त्यांच्या लाल महाल इमारतीमधील घरात लपवून ठेवल्याचा संशय ठेकेदार पिंगुळकर यांनी कोपरी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीमध्ये व्यक्त केला. त्याच आधारे पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांच्या पथकाने आसवानी यांचा मुलगा हिरेन आसवानी याला त्यांची खोली उघडण्यास सांगितले. तेंव्हा याच खोलीतून हिरेन याच्या साक्षीनेच पोलिसांनी ही ब्रेकर मशिन जप्त केली. साक्षात वकीलाविरुद्ध चोरीची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनीही सावध पवित्रा घेत आधी दिलीप आसवानी यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्याबाबत रितसर नोटीस बजावली. बुधवारी सकाळी ११ ऐवजी दुपारी ४ वाजताची त्यांनी वेळ घेतली. मात्र, ते पोलीस ठाण्यात हजरच झाले नाही. अशा गुन्हयात तीन वर्षाची शिक्षा होऊ शकते, असेही एका पोलीस अधिकाºयाने सांगितले. दरम्यान, वकीलाविरुद्ध चोरीची तक्रार दाखल झाल्याने ठाणे न्यायालय वर्तुळात हा चर्चेचा विषय झाला होता.

Web Title: Shocking! A case of theft against a lawyer in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.