धक्कादायक! घरात सतत देवपूजा करणाऱ्या आईला मुलाने केला मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 11:40 PM2018-08-28T23:40:30+5:302018-08-28T23:40:57+5:30

देवाची अती भक्ती केल्याचा राग आल्याने पोटच्या मुलानेच आपल्या आईच्या गळ्यात चाकू खुपसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Shocking A child is trying to kill a mother when she worshiping God in the house | धक्कादायक! घरात सतत देवपूजा करणाऱ्या आईला मुलाने केला मारण्याचा प्रयत्न

धक्कादायक! घरात सतत देवपूजा करणाऱ्या आईला मुलाने केला मारण्याचा प्रयत्न

Next

बदलापूर : देवाची अती भक्ती केल्याचा राग आल्याने पोटच्या मुलानेच आपल्या आईच्या गळ्यात चाकू खुपसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बदलापूरच्या शिरगांव शिंदे आळी भागात हा प्रकार घडला आहे. सुनीता धेंडे या आपला मुलगा आकाश धेंडे याच्यासोबत राहतात. सुनीता यांच्या घरी देवारा आहे. त्यांना देवभक्तीची आवड असल्याने त्या नेहमी देवपुजा करत असतात. पण आपली आई सतत देवदेव करत असल्यामुळे त्याचा राग मुलगा आकाशला येत होता. याच कारणावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.
त्या भांडणात संतापलेल्या आकाशने आई सुनीता हिच्या गळ्यात धारदार चाकू खुपसून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी झालेल्या सुनीताला उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात आकाशच्या विरुद्ध आईला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली.

Web Title: Shocking A child is trying to kill a mother when she worshiping God in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.