धक्कादायक! ठाण्यातून बेपत्ता झालेला व्यावसायिक मिळाला चिपळूणला!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 12:10 AM2021-07-12T00:10:46+5:302021-07-12T00:14:17+5:30

लॉकडाऊनमुळे व्यवसायातून चार ते पाच लाखांचे कर्ज झाल्याने घरातून बेपत्ता झालेल्या ज्ञानेश रामप्रभू वैद्य (३२, रा. चरई, ठाणे ) याचा चिपळूण येथून शोध घेण्यात नौपाडा पोलिसांना रविवारी यश आले.

Shocking! Chiplun finds missing businessman from Thane | धक्कादायक! ठाण्यातून बेपत्ता झालेला व्यावसायिक मिळाला चिपळूणला!

कर्जबाजारी झाल्याने सोडले घर

Next
ठळक मुद्देकर्जबाजारी झाल्याने सोडले घरनौपाडा पोलिसांनी घेतला शोध

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: लॉकडाऊनमुळे व्यवसायातून चार ते पाच लाखांचे कर्ज झाल्याने घरातून बेपत्ता झालेल्या ज्ञानेश रामप्रभू वैद्य (३२, रा. चरई, ठाणे ) याचा चिपळूण येथून शोध घेण्यात नौपाडा पोलिसांना रविवारी यश आले. तो सुखरुप घरी परतल्यामुळे कुटूंबींयानी समाधान व्यक्त केले आहे.
ठाण्यातील सेंट जॉन हायस्कूलच्या बाजूला चरई येथे ज्ञानेश याचे अवधूत फॅब्रिकेटर्स हा वेल्डींगचा व्यवसाय आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे त्याला मित्र परिवाराकडून कर्ज घ्यावे लागले होते. आता काहींनी त्याच्याकडे कर्ज परत फेडीसाठी तगादा लावल्यामुळे तो कोणालाही काहीही न सांगता ७ जुलै २०२१ रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास ठाण्यातून अचानक बेपत्ता झाला. कुटूंबीयांनी त्याची वाट पाहून याप्रकरणी ८ जुलै रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि रवींद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार आर. एन. आरोंदेकर आणि पोलीस नाईक किशोर काळे यांनी तांत्रिक विश्लेषण सतेच खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्याचा चिपळूण येथे शोध घेतला. त्याला नातेवाईकांच्या मदतीने ११ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास चिपळूण येथील एसटी बस थांब्यासमोरुन ताब्यात घेतले. कर्जबाजारी झाल्याने आपण घर सोडल्याची कबूली त्याने पोलिसांना दिली. याप्रकरणी सखोल तपास करण्यात येत असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.

Web Title: Shocking! Chiplun finds missing businessman from Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.