धक्कादायक! मित्राशी शरीरसंबंध ठेवण्याची पत्नीला सक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 04:36 AM2018-08-29T04:36:21+5:302018-08-29T04:36:41+5:30
पतीने स्वत:च्याच पत्नीला मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेत उघडकीस आली आहे.
कल्याण : पतीने स्वत:च्याच पत्नीला मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेत उघडकीस आली आहे. या प्रकाराचे चित्रीकरण व्हायरल करण्यासह, कुठे वाच्यता केल्यास भावाचे हातपाय कापण्याची धमकीही पतीने दिली. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी पती व त्याच्या मित्राविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
मागील आठवड्यात ही घटना घडली होती. आरोपी पतीने २८ वर्षांच्या पत्नीला शीतपेय दिले. त्यामुळे तिला चक्कर आली. त्याचा फायदा घेत पतीच्या मित्राने तिला स्पर्श केला. मात्र, विवाहितेने त्यास विरोध केला. पतीने तिला मित्रासोबत संबंध ठेवण्याची धमकी दिली. तसे न केल्यास व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर पतीसमोरच मित्राने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर, या दोघांनी पुन्हा बलात्कार केला. मित्र पत्नीवर बलात्कार करत असतानाचे चित्रीकरण तिचा पती करत होता. याबाबत कुणाला सांगितले तर तुझ्या भावाचे हातपाय कापेन, अशी धमकी दिल्याचेही विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे.