धक्कादायक! सासूनंतर सुनेलासुद्धा झाला कोरोना; प्रशासनाची उडाली तारांबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 07:57 PM2020-04-09T19:57:04+5:302020-04-09T19:58:10+5:30
मंगळवारी मीरा रोडच्या नयानगर मधील पूजा नगर मध्ये राहणा-या ५० वर्षीय इसमाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.
मीरारोड - मीरा भाईंदरमध्ये बुधवारी कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळून आला नव्हता तर आज गुरुवारी कोरोनाचा १ रुग्ण आढळला आहे. मीरारोडच्या विनय नगर मध्ये राहणा-या ३४ वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाली आहे. तिच्या ५६ वर्षीय सासूला आधीच कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या २० झाली असून ५३ जणांचे कोरोना चाचणी अहवाल अजून यायचे आहेत.
मंगळवारी मीरा रोडच्या नयानगर मधील पूजा नगर मध्ये राहणा-या ५० वर्षीय इसमाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तर दोन कोरोनाचे रुग्ण बरे झाले. बुधवारी शहरात कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळून आला नव्हता तर आज गुरुवारी एक रुग्ण वाढला आहे. सदर नवीन रुग्ण ३४ वर्षांची महिला आहे. तिच्या ५६ वर्षीय सासूला कोरोना झाल्याचे पालिकेने ६ एप्रिल रोजी सांगितले होते.
शहरात कोरोनाचे २० रुग्ण असून, १५१ जणांची कोरोना चाचणी केली असता त्यात ७५ जणांचे निगेटिव्ह , २३ जणांचे पॉझिटिव्ह तर ५३ जणांचे अहवाल अजून यायचे आहेत. पालिकेच्या अलगीकरण केंद्रात ६३ जण तर घरीच अलगीकरण ठेवलेल्यांची संख्या ४६६ इतकी आहे. भाईंदर येथील जोशी रुग्णालयात ५४ जणांना ठेवलेले आहे. यात काही कोरोनाचे रुग्ण तर काही अहवाल प्रलंबित असल्याने ठेवलेली लोक आहेत.