धक्कादायक! प्रेमसंबंधाच्या चित्रणाच्या आधारे ठाण्यातील तरुणीकडे एक लाखांच्या खंडणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 04:32 PM2020-05-06T16:32:28+5:302020-05-06T20:39:00+5:30

एका प्रेमीयुगूलाच्या प्रेम संबंधाच्या खासगी क्षणांचे काही चित्रण आणि फोटो असलेला पेनड्राईव्ह भलत्याच व्यक्तीच्या हाताला लागला. आता या भामटयाने हीच संधी साधत या तरुणीसह तिच्या प्रियकर आणि भावाकडेही एक लाखांच्या खंडणीची मागणी केली आहे. खंडणी दिली नाही तर मात्र हे फोटो व्हायरल करण्याचीही धमकी त्याने दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणीला परदेशातील फोनवरुन धमकी देणारा हा भामटा कोण याचा शोध आता ठाणे पोलीस घेत आहेत.

 Shocking! Demand for Rs 1 lakh ransom from a young woman in Thane on the basis of a love affair | धक्कादायक! प्रेमसंबंधाच्या चित्रणाच्या आधारे ठाण्यातील तरुणीकडे एक लाखांच्या खंडणीची मागणी

प्रियकरासोबतच्या क्षणांचे चित्रण होते पेनड्राईव्हमध्ये

Next
ठळक मुद्दे वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलप्रियकरासोबतच्या क्षणांचे चित्रण होते पेनड्राईव्हमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: एका तरुणीने भूतकाळात प्रियकरासोबत व्यतीत केलेल्या प्रेमसंबंधाचे चित्रण असलेला पेन ड्राइव्ह अन्य एका व्यक्तीच्या हाती लागला. आता याच पेनड्राइव्हच्या आधारे तिला ब्लॅकमेल करीत तिच्याकडून एक लाखांची खंडणीची मागणी करण्यात आल्याची घटना माजीवडा भागात घडली आहे. याप्रकरणी या तरुणीने वर्तकनगर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल केला आहे.
पोखरण रोड क्रमांक दोन, माजीवडा भागात राहणारी ही २९ वर्षीय तरुणी भूतकाळातील या वादग्रस्त व्हिडीओमुळे चांगलीच अडचणीत सापडली आहे.पिडीत तरु णी २०१८ मध्ये कासारवडवली येथे एका ठिकाणी नोकरीला होती. तिथेच एका सहकारी तरुणाबरोबर तिचे प्रेमसंबंध जुळले. कालांतराने भांडणे होऊन दोघेही विभक्त झाले. तिनेही कासारवडवली येथील नोकरी सोडून वर्तकनगर परिसरात नोकरी सुरु केली. अचानक एक दिवस तिच्या मोबाईलवर एका व्यक्तीचा फोन आला. ‘मी तुला किती शोधले, आता सापडलीस’, असे म्हणत, त्याने तुझ्या प्रेमसंबंधाचे फोटो आणि व्हिडीओ आपल्याकडे असून एक लाख रुपये दे नाहीतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करील, अशी धमकीही त्याने दिली. हा फोन ऐकल्यानंतर धक्काच बसलेल्या या तरुणीने तिच्या पूर्वीच्या प्रियकराला फोन करून विचारणा केली. तेव्हा त्यानेही आपल्या दोघांचे चित्रणाचा पेनड्राइव्ह हरविल्याचे स्पष्ट केले. तेंव्हा तिने या प्रकाराची माहिती त्याला दिली. तिला धमकावणाऱ्याने काही फोटो तरु णीच्या भावाला आणि तिच्या गावाकडील काही जणांना व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविले आहे. विशेष म्हणजे खंडणी दिली नाही तर पेनड्राइव्हमधील व्हिडीओ व्हायरल करण्याचीही धमकी या तरुणीसह तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर आणि तिच्या भावालाही देण्यात आली आहे. २७ मार्च ते ४ मे २०२० रोजी घडलेल्या या प्रकाराची या तरुणीने ४ मे २०२० रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी खंडणीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यातील धमकी देणा-याचा फोन क्रमांक हा परदेशातील असल्याचे आढळले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी सांगितले.

Web Title:  Shocking! Demand for Rs 1 lakh ransom from a young woman in Thane on the basis of a love affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.