धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या जन्मदात्या पित्यास तीन वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 08:29 PM2021-09-03T20:29:06+5:302021-09-03T20:32:08+5:30

आपल्याच पोटच्या मुलीचा विनयभंग करणाºया ५० वर्षीय पित्याला तीन वर्षे सक्तमजूरीची तसेच दहा हजारांच्या दंडाची शिक्षा ठाणे जिल्हा आणि विशेष पोस्को न्यायाधीश एन. के. ब्रह्मे यांनी शुक्रवारी ठोठावली आहे.

Shocking! Father sentenced to three years for molesting minor girl | धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या जन्मदात्या पित्यास तीन वर्षांची शिक्षा

ठाणे जिल्हा न्यायालयाचा आदेश

Next
ठळक मुद्देठाणे जिल्हा न्यायालयाचा आदेशमीरा रोड येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: आपल्याच पोटच्या मुलीचा विनयभंग करणाºया ५० वर्षीय पित्याला तीन वर्षे सक्तमजूरीची तसेच दहा हजारांच्या दंडाची शिक्षा ठाणे जिल्हा आणि विशेष पोस्को न्यायाधीश एन. के. ब्रह्मे यांनी शुक्रवारी ठोठावली आहे. दंड न भरल्यास तीन महिन्यांची अतिरिक्त शिक्षाही न्यायालयाने सुनावली.
मीरा-भार्इंदर व वसई- विरार पोलीस आयुक्तालयाच्या निर्मितीनंतर तसेच न्यायाधीश ब्रह्मे यांनी ही ठाणे न्यायालयात सुनावलेली पहिलीच शिक्षेची घटना आहे. आरोपी, तक्र ारदार आई आणि पीडित मुलगी असे तिघे १ आॅगस्ट २०१४ रोजी रात्रीचे जेवण करून घरात झोपले होते. त्यावेळी आरोपीने १ आॅगस्ट रोजी रात्री ११ ते २ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान आपल्याच मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पिडितेने या प्रकाराची माहिती तिच्या आईला दिली. याचा जाब विचारल्यानंतर पित्याने तिच्या आईलाच शिवीगाळ करीत मारहाण केली. मुलीच्या आईने अखेर मीरा रोड पोलीस ठाण्यात या नराधम पित्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक सुरेश खेडेकर आणि सहायक पोलीस निरीक्षक पी. एस. साळुंखे यांच्या पथकाने आरोपीला अटक केली होती. तपासाअंती याप्रकरणी ठाणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हा खटला न्यायाधीश ब्रह्मे यांच्या न्यायालयात आल्यानंतर सरकारी वकील संजय मोरे यांनी भक्कम पुरावे सादर करीत तीन साक्षीदार हजर करुन आरोपीला शिक्षा देण्यासाठी जोरदार बाजू मांडली. यामध्ये साक्षीदारांची साक्षही महत्वाची ठरली. त्याच आधारे आरोपीला दोषी ठरवून त्याला तीन वर्षे कारावासासह दहा हजार रु पये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंडातील पाच हजार रु पये पीडितेला आणि उर्वरित पाच हजार रुपये शासनाकडे जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. दंड न भरल्यास तीन महिन्यांची अतिरिक्त शिक्षाही सुनावली. न्यायालयीन पैरवी अधिकारी म्हणून पोलीस अंमलदार श्रीराम भोसले यांनी काम पाहिले.

Web Title: Shocking! Father sentenced to three years for molesting minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.