धक्कादायक! केकमधून विषबाधा झाल्याच्या नावाखाली ४० हजारांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 10:56 PM2020-10-19T22:56:02+5:302020-10-19T22:58:47+5:30
अन्न निरीक्षक असल्याची बतावणी करीत केकच्या एका महिला व्यावसायिकाला ४० लाखांचा गंडा घालणाऱ्या दुकलीपैकी राहूल गायकवाड (२६, रा. पनवेल, जि. रायगड) याला नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: केकमधून विषबाधा झाल्याच्या नावाखाली ४० हजारांची फसवणूक करणाºया राहूल गायकवाड (२६, रा. पनवेल, जि. रायगड) याला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या अन्य दोन साथीदारांचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गोकूळनगर येथे राहणाºया तन्वी किरावंत (२८) यांचे चरईतील गणेश सिनेमा परिसरात केकचे दुकान आहे. विश्वनाथ पाटील याने १ आॅगस्ट ते ३ आॅगस्ट २०२० या दरम्यान त्याने आपण अन्न सुरक्षा अधिकारी असल्याची मोबाइलद्वारे बतावणी केली. त्यानंतर २७ फेब्रुवारी २०२० रोजी स्मिता काटे यांनी तुमच्या दुकानातून घेतलेल्या पेस्टीमुळे त्यांच्या मुलीला विषबाधा झाल्याचा आरोप केला. या विषबाधेच्या उपचारासाठी २३ हजार २०० इतका रुग्णालयीन खर्च त्यांना आला. त्यामुळेच केकची न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून तपासणी केली. त्यामुळे त्यांनी या विषबाधेबाबत त्यांच्या कार्यालयात तक्रार दिली आहे. त्यामुळेच या केकचे दुकान सिल करण्यात येणार आहे. हा प्रकार समजताच तन्वी यांनी स्मिता काटे या महिलेला मोबाईलवरुन संपर्क केला. त्यावेळी एनओसी देण्यासाठी काटे या महिलेनेही २३ हजार २०० रुपये तसेच दंडापोटी १६ हजार ९०० रुपये अशा ४० हजार १०० रुपयांची त्यांच्याकडे मागणी केली. हे पैसे त्यांनी काटे यांच्या मोबाइलवरुन आॅनलाईन पाठविण्यास त्यांना भाग पाडले. यातील दंडाची रक्कम ही परत मिळणार असल्यामुळे वागळे इस्टेट येथील अन्न सुरक्षा यांच्या कार्यालयात त्यांना येण्यास सांगितले. त्यानंतर मात्र, यातील महिलेने आणि तिच्या साथीदारांनी त्यांचे फोन बंद करुन ठेवले. तन्वी यांच्या केकच्या दुकानाविरुद्ध कोणतीही तक्रार नसतांनाही त्यांच्या केकच्या सेवनाने विषबाधा झाल्याच्या नाावाखाली ४० हजार १०० रुपयांची फसवणूक करणाºया दुकलीपैकी राहूल गायकवाड याला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्या पथकाने ९ आॅक्टोबर रोजी अटक केली आहे. त्याच्याकडून एक मोबाइलही जप्त करण्यात आला आहे.
* यातील राहूल सराटे हाच मुख्य सूत्रधार आहे. त्यानेच स्मिता काटे नावाच्या महिलेचा तसेच अन्न सुरक्षा अधिका-याचाही आवाज काढला. एखाद्याची फसवणूक केल्यानंतर राहूल गायकवाड याच्या बँक खात्यात तो पैसे भरत होता. यातील काही रक्कम गायकवाड स्वत:कडे ठेवून उर्वरित रक्कत सराटेला देत होता. सराटेचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.