धक्कादायक! अवघ्या दहा रुपयांसाठी कळव्यात मित्राचा खून: चौकडीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 12:49 AM2020-11-18T00:49:00+5:302020-11-18T00:51:57+5:30

दारुसाठी दहा रुपयांची मागणी करणाऱ्या सुरेश भागोजी बाकाडे (३५) या मित्राचा खून करणाºया चौकडीपैकी संदीप चव्हाण (२६) याला मंगळवारी कळवा पोलिसांनी अटक केली आहे. संदीपने पैसे देण्यास नकार दिल्याने सुरेशने शिवीगाळ केली. त्यामुळे संदीपसह चौघांनी सुरेशला बेदम मारहाण केली. या मारहाणीतच त्याचा मृत्यु झाला.

Shocking! Friend's murder reported for just Rs 10: Four arrested | धक्कादायक! अवघ्या दहा रुपयांसाठी कळव्यात मित्राचा खून: चौकडीला अटक

दारुसाठी मागितले होते पैसे

Next
ठळक मुद्देदारुसाठी मागितले होते पैसेकळवा पोलिसांनी केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : दारुसाठी दहा रुपयांची मागणी करणा-या सुरेश भागोजी बाकाडे (३५, रा. घोलाईनगर, कळवा, ठाणे) या मित्राचा खून करणा-या चौकडीपैकी संदीप चव्हाण (२६, रा. घोलाईनगर, कळवा) याला मंगळवारी कळवा पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणात तिघांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती.
कळव्यातील घोलाईनगर भागातच सुरेश याच्यासह त्याचे चौघेही मित्र वास्तव्याला आहेत. १४ नोव्हेंबर रोजी रात्री १०.४५ ते १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान घोलाईनगरकडे जाणाºया रस्त्यावर या चौघांनी दारुच्या नशेतील सुरेश याला लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली होती. या मारहाणीत बेशुद्ध पडून त्याचा मृत्यु झाला होता. याप्रकरणी १५ नोव्हेंबर रोजी कळवा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. सुरुवातीला याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर आणि पोलीस निरीक्षक आजगावकर यांच्या पथकाने संतोष गायकवाड (२५) आणि पप्पू दुबे (३०) या दोघांना अटक केली होती. त्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी कल्पेश चव्हाण याला तर संदीप चव्हाण या सूत्रधाराला मंगळवारी (१७ नोव्हेंबर रोजी ) अटक केल्याचे सहायक पोलीस आयुक्त सुनिल घोसाळकर यांनी सांगितले. दारुसाठी दहा रुपयांची मागणी केल्यानंतर संदीपने सुरेशला नकार दिला. त्यानंतर सुरेशने शिवीगाळ केल्यामुळे संदीपसह चौघांनी सुरेशला बेदम मारहाण केली. या मारहाणीतच त्याचा मृत्यु झाला. चौघांनाही २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

Web Title: Shocking! Friend's murder reported for just Rs 10: Four arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.