धक्कादायक! डोंबिवलीतील कर्मचाऱ्याची सोनसाखळी ठाण्यात लुबाडली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 12:05 AM2021-07-26T00:05:29+5:302021-07-26T00:08:30+5:30
डोंबिवलीत राहणाºया एका ४४ वर्षीय कर्मचाºयाची १५ ग्रॅम वजनाची सोनसाखळी मोटारसायकलीवरुन आलेल्या दोघांनी लुबाडल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: डोंबिवलीत राहणाºया एका ४४ वर्षीय कर्मचाºयाची १५ ग्रॅम वजनाची सोनसाखळी मोटारसायकलीवरुन आलेल्या दोघांनी लुबाडल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला असून आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी दोन पथकांची निर्मिती केली आहे.
डोंबिवलीत राहणारे हे कर्मचारी २४ जुलै रोजी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारस ठाण्यातील गडकरी रंगायतन नाटयगृहाच्या गेटसमोरुन जात होते. त्याचवेळी मोटारसायकलीवरुन आलेल्या दोघांनी त्यांना ठाणे स्टेशनकडे जाणारा रस्ता कोणता आहे, अशी विचारणा केली. तेंव्हा मोटारसायकलीवर मागे बसलेल्या भामटयाने त्यांच्या गळयातील २२ हजार ५०० रुपयांची सोनसाखळी जबरीने खेचली. त्यानंतर या दोघांनी तिथून पलायन केले. या घटनेनंतर पोलिसांनी नाकाबंदी केली. आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी सांगितले.