धक्कादायक! ठाण्यातील नाल्यात पडून जीम प्रशिक्षकाचा मृत्यु

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 07:25 PM2021-06-15T19:25:42+5:302021-06-15T19:28:21+5:30

कॅडबरी जंक्शन ते नितीन कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाल्याचे बांधकाम सुरु असलेल्या १२ फूट खोल नाल्यात कोसळून प्रसाद देऊलकर (३५, रा. दिवा, ठाणे) या मोटारसायकलवरील जीम प्रशिक्षकाचा (इन्स्ट्रक्टर) मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

Shocking! Gym instructor dies after falling into nala in Thane | धक्कादायक! ठाण्यातील नाल्यात पडून जीम प्रशिक्षकाचा मृत्यु

धक्कादायक! ठाण्यातील नाल्यात पडून जीम प्रशिक्षकाचा मृत्यु

googlenewsNext
ठळक मुद्दे ठेकेदाराविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा हलगर्जीपणाचा ठपका

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कॅडबरी जंक्शन ते नितीन कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाल्याचे बांधकाम सुरु असलेल्या १२ फूट खोल नाल्यात कोसळून प्रसाद देऊलकर (३५, रा. दिवा, ठाणे) या मोटारसायकलवरील जीम प्रशिक्षकाचा (इन्स्ट्रक्टर) मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी बांधकाम ठेकेदाराविरुद्ध हलगर्जीपणा तसेच मृत्युस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
प्रसाद हा आपल्या ठाण्यातील सावरकरनगर येथील मित्राकडे काही कामानिमित्त रात्री आला होता. तो मंगळवारी पहाटेच्या सुमारास संभाजी नगर, वागळे इस्टेट, क्रिटीकेअर हॉस्पीटल समोरील रस्त्याने जात होता. जवळच नाल्याच्या डायव्हर्शनचे बांधकाम सुरु आहे. नेमकी या बांधकामाच्या ठिकाणी जिथे कोणताही आडोसा नव्हता, त्याच ठिकाणाहून प्रसाद मोटारसायकलवरुन आत शिरला. यात तो १२ फूट खोल नाल्यात कोसळला. त्याची मोटारसायकल एका वाहिनीवर आदळली. पडल्यानंतर अर्ध्या तासाने काही स्थानिकांच्या लक्षात आले. त्याला एका खासगी रुग्णालयात दाखलही करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक, अग्निशमन दलासह वागळे इस्टेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याठिकाणी या पथकांनी मदतकार्यही केले. मात्र, प्रसादचा जीव वाचू शकला नाही. दरम्यान, बांधकामाच्या ठिकाणी पुरेसे संरक्षक बॅरिकेटस् किंवा अन्य साधनसामुग्री उभी न करता हलगर्जीपणा करणाºया संबंधित कामाच्या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता ढोले यांनी दिली.

Web Title: Shocking! Gym instructor dies after falling into nala in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.