धक्कादायक! ठाण्यात जुगार खेळण्यास मज्जाव केल्याने परिचारीकेसह तिच्या पतीलाही मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 09:39 PM2020-05-12T21:39:23+5:302020-05-12T21:47:32+5:30
वैद्यकीय सेवा देणाऱ्या कोविड योद्धयांवर कोणीही हल्ला करु नये असे राज्य आणि केंद्र शासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे. तरीही कळवा येथे जुगार खेळण्याला विरोध करणाºया परिचारिकेसह तिच्या पतीलाही मारहाण झाल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोरोना या साथीच्या आजाराविरुद्ध लढा देण्यासाठी डॉक्टर आणि परिचारिका आपल्या जीवाची बाजी लावून काम करीत आहेत. एकीकडे त्यांचे कौतुक होत असतांनाच दुसरीकडे कळव्यात जुगाराला विरोध करणाºया संगीता काटे या परिचारिकेसह तिच्या पतीलाही मारहाण झाल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी मंगळवारी केली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा रेल्वे स्थानकाजवळील चिंचपाडा परिसरातील एका इमारतीच्या आवारात तळ मजल्यावर वास्तव्यास असलेली व्यक्ती व्यक्ती बाहेरील त्याच्या बाहेरील मित्रांना घेऊन त्याठिकाणी ८ मे रोजी जुगार खेळत होती. कोरोनामुळे सोसायटीतील रहिवाशी परिचारिका संगीता काटे यांनी त्यांच्या मेडिकलच्या अनुभवातून त्यांना याठिकाणी बाहेरी व्यक्तींना प्रवेश न देण्याची तसेच जुगार न खेळण्याचे आवाहन केले. याच रागातून राजू शेट्टीसह त्याच्या कुटूंबातील चौघांनी संगीता तसेच त्यांचे पती अर्जून या दोघांनाही अश्लील शिवीगाळ करीत मारहाण केली. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात काटे यांनी तक्र ार दाखल केली आहे. याप्रकरणी अद्याप कोणावरही कारवाई झाली नसून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. या मारहाण प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार करुनही संबंधितांवर कारवाई झाली नसल्याचा आरोप काटे यांनी केला आहे.