उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या धाडीनंतर धक्कादायक माहिती आली समोर: संदपमध्ये पाणी चोरी नाहीच?
By अनिकेत घमंडी | Published: March 14, 2023 06:21 PM2023-03-14T18:21:52+5:302023-03-14T18:22:20+5:30
Dombivali: उद्योग मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्याकडे आलेल्या पाणीचोरीच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन सोमवारी मध्यरात्री डोंबिवलीत संदप गावादरम्यान येऊन पाणी चोरीच्या तक्रारी आल्या असून महापालिका प्रशासनाने त्याची तात्काळ तपासणी करून माहिती देण्याचे आदेश दिले.
डोंबिवली - उद्योग मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्याकडे आलेल्या पाणीचोरीच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन सोमवारी मध्यरात्री डोंबिवलीत संदप गावादरम्यान येऊन पाणी चोरीच्या तक्रारी आल्या असून महापालिका प्रशासनाने त्याची तात्काळ तपासणी करून माहिती देण्याचे आदेश दिले.
मंत्र्यांच्या धाडीनंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे पथक मंगळवारी संदप गावात दाखल झाले. सामंत यांनी सांगितलेल्या तिन्ही ठिकाणी पाहणी केली असता पाणी चोरी होतच नसल्याची धक्कादायक माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली, त्यामुळे मंत्री सामंत यांच्याकडे आलेल्या तक्रारीत तथ्यता नव्हतेच का अशी उलट सुलट चर्चा शहरात सुरू आहे. तेथे नळ जोडणी अनधिकृत आहेत का? पाण्याची चोरी सुरू आहे का? याची तपासणी महापालिकेने सुरू केली. त्यामधील सामंत यांनी आक्षेप घेतलेल्या एका मिनरल पाणी बाटल्याच्या कारखान्याला बोअरवेलचे पाणी असल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आले होते, मात्र संबंधित मालकाने बोअरिंगची परवानगीची कागदपत्र महापालिकेला सादर केली असून त्याची शहानिशा सुरू असल्याचं महापालिका अधिकाऱ्यानी सांगितलं.
सध्याच्या चौकशीत पाणी चोरी नसल्याचे दिसून येत आहे दुसऱ्या ठिकाणी देखील अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्या ठिकाणी देखील पाणी चोरी आढळून आली नाही आता तिसऱ्या ठिकाणी पाहणी होणार आहे मात्र ज्या प्रकारे मंत्री महोदयांनी पाणी चोरीबद्दल खुलासा केला होता तशी परिस्थिती दिसून न आल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. महापालिका क्षेत्रातील २७ गावांमध्ये भेडसावणार्या पाणीटंचाईची शासनाने दखल घेतली आहे. २७ गावांमधील संदप गाव परिसरात टँकर माफियांकडून मोठ्या प्रमाणात पालिकेच्या पाईप लाईन मधून पाणी चोरी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या . या पार्श्वभूमीवर काल उद्योग मंत्री उदय सन्मान यांनी संदप परिसरात तीन ठिकाणी अचानक धाडी टाकल्या. त्या ठिकाणी टॅपिंग करत पाण्याचा कारखाना तर दोन ठिकाणी टॅपिंग करत टँकर भरला जात असल्याचे उघडकीस आणले. त्याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हे देखील दाखल करण्यात आले असून त्याचीही चौकशी करण्यात आली आहे.
मंत्र्यांच्या धाडीनंतर खडबडून जागे झालेल्या केडीएमसी प्रशासनाचे पथक आज संदप गावात दाखल झाले . त्यांनी मिनरल वॉटर च्या प्लांट्स इतर दोन ठिकाणी देखील तपासणी सुरू केलीये . सध्या या मिनरल वॉटरच्या प्लांटमध्ये पाणी कुठून येते तसंच इतर दोन ठिकाणी कुठली पाण्याची पाईपलाईन आहे याबाबत शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. याबाबत महापालिकेचे कार्यकारी अभियंता किरण वाघमारे यांनी पहिल्या ठिकाणी तपासणी झाली असून मिनरल प्लांटमध्ये बोरिंग मधून पाणी येते सदर बोरिंग चे संबंधित मालकाकडे परवानगी असून ते परवानगी पत्र ते महापालिकेला सादर करणार असल्याचे सांगितले. तीन पैकी आतापर्यंत दोन ठिकाणी पाणी चोरीची तथ्यता नसल्याचे आढळून आले आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केलेल्या पाहणीत पाणी चोरी संदर्भात कोणतीही तथ्यता आढळून आली नाही, पण त्यानिमित्ताने कोंबिंग ऑपरेशन करून बहुतांशी ठिकाणची पाहणी करण्यात आली. -
किरण वाघमारे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, केडीएमसी
त्या घटनेत घटनास्थळी गेल्यावर टँकर आढळून आले, त्यात पाणी कुठून येते, ते वैध असते की नाही याचा तपास सुरू असून सध्या त्या विषयात तीन जणांवर गुन्हे दाखल।करण्यात आले आहेत, आणि चौकशी सुरू आहे - शेखर बागडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानपाडा पोलीस ठाणे