इन्स्टावर सांकेतिक भाषेचा वापर करून आयोजन, ठाण्यातील रेव्ह पार्टीबाबत धक्कादायक माहिती उघड

By जितेंद्र कालेकर | Published: December 31, 2023 07:08 PM2023-12-31T19:08:22+5:302023-12-31T19:08:51+5:30

Thane Crime News: नववर्षाच्या पूर्वसंध्येला ठाण्यातील घोडबंदर रोड वडवली गावाजवळील खाडी किनारी अंमली पदाथार्ंचे सेवन करीत दम मारो दम...ची रेव्ह पार्टी करणाऱ्या तब्बल ९० तरुण आणि पाच तरुणींच्या दोन गटांवर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने धाड टाकून त्यांना ताब्यात घेतले.

Shocking information revealed about a rave party in Thane, organized using sign language on Instagram | इन्स्टावर सांकेतिक भाषेचा वापर करून आयोजन, ठाण्यातील रेव्ह पार्टीबाबत धक्कादायक माहिती उघड

इन्स्टावर सांकेतिक भाषेचा वापर करून आयोजन, ठाण्यातील रेव्ह पार्टीबाबत धक्कादायक माहिती उघड

- जितेंद्र कालेकर
ठाणे - नववर्षाच्या पूर्वसंध्येला ठाण्यातील घोडबंदर रोड वडवली गावाजवळील खाडी किनारी अंमली पदाथार्ंचे सेवन करीत दम मारो दम...ची रेव्ह पार्टी करणाऱ्या तब्बल ९० तरुण आणि पाच तरुणींच्या दोन गटांवर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने धाड टाकून त्यांना ताब्यात घेतले. यामध्ये पार्टीचे आयोजन करणारे सुजल महाजन (१८) आणि तेजस कुबल (२३) या दोघांनाही अमली पदार्थाची विक्री केल्याप्रकरणी अटक केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी रविवारी दिली.

इन्स्टाग्रामवर एका सांकेतिक भाषेचा वापर करीत सुजल आणि तेजस यांनी प्रत्येकी एक हजार रुपयांचे शुल्क आकारुन या पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीसाठी ठाणे, नवी मुंबई, कल्याण - डोंबिवली आणि मीरारोड भागातून दाखल झालेल्या तरुणांची नशा ठाणे पोलिसांनी धाडीनंतर उतरवली. या धाडसत्रात २९ मोटारसायकली आणि आठ लाखांहून अधिक किंमतीचा अंमली पदार्थ जप्त केला आहे. यामध्ये चरस, गांजासह बियर, वाईन, व्हिस्की आणि एलएसडी आदीचा समावेश आहे.

नववर्ष स्वागताच्या निमित्ताने आयोजित पाटर्यामध्ये अंमली पदार्थांची विक्री व सेवनाच्या पाटर्यांवर नजर ठेवून कडक कारवाईचे आदेश ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ३० डिसेंबर २०२३ रोजी वडवलीतील खाडी किनारी एका निर्जनस्थळी दाेघा तरुणांनी अंमली पदार्थाच्या विक्रीसह रेव्ह पाटीर्चे आयोजन केल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे उपायुक्त शिवराज पाटील आणि सहायक पोलिस आयुक्त निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास ष्घोडके , सहायक पोलिस निरीक्षक भूषण शिंदे, पल्लवी ढगे पाटील, अविनाश महाजन आणि भिवंडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक सचिन ढोके आदींच्या पथकाने ३१ डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास वडवलीतील ही पार्टी उद्ध्वस्त केली. यातील अनेक तरुण हे नशेमध्ये मद्यधुंद अवस्थेत डिजेच्या गाण्यावर थिरकताना आढळले. पाटीर्चे आयोजन करणाऱ्या दुकलीला ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध कासारवडवली पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या ताब्यातून आठ लाख तीन हजार ५६० रुपयांचा अमली पदार्थ हस्तगत केला. यामध्ये चरस ७० ग्रॅम, ४१ ग्रॅम एलएसडी , २.१० ग्रॅम एस्कैंटसी पिल्स, २.१० ग्रॅम गांजा, २०० ग्रॅम, बिअर-बाईन- व्हिस्कीचा समावेश आहे.
 

काय मिळाले पार्टीमध्ये 
या पार्टीमध्ये चरस, गांजासह गांजा पिण्याचे साहित्य, डीजे वाजविण्याची सामुग्री अशी सामुग्री जप्त केली आहे. एका िठकाणी ५० तर दुसऱ्या ठिकाणी ४० अशा दाेन गटात हे नशेबाज पाेलिसांना मिळाले.

Web Title: Shocking information revealed about a rave party in Thane, organized using sign language on Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.