धक्कादायक! अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2020 11:39 PM2020-11-01T23:39:01+5:302020-11-01T23:43:41+5:30

अवघ्या तीन वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाºया योगेश सिताराम चव्हाण (३६) याला नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. योगेशने त्याच्या घरात पिडित मुलाला खेळण्याच्या बहाण्याने नेले. तिथेच त्याच्याशी त्याने हे गैरकृत्य केले.

Shocking! Man arrested for sexually abusing a minor | धक्कादायक! अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक

नौपाडा पोलिसांची कारवाई

Next
ठळक मुद्देनौपाडा पोलिसांची कारवाईठाण्याच्या सिद्धेश्वर तलाव येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: अवघ्या तीन वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाºया योगेश सिताराम चव्हाण (३६, रा. नौपाडा, ठाणे) याला नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.
सिद्धेश्वर तलाव पाटीलवाडी, नौपाडा भागातील रहिवाशी योगेश याने त्याच परिसरातील या तीन वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार २१ आॅक्टोबर रोजी दुपारी २.३० ते २२ आॅक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडला. योगेशने त्याच्या घरात पिडित मुलाला खेळण्याच्या बहाण्याने नेले. तिथेच त्याच्याशी त्याने हे गैरकृत्य केले. आपल्यावर गुदरलेला प्रसंग पिडित मुलाने त्याच्या आईला खुणा करुन सांगितल्यानंतर त्याच्या कुटूंबियांनी याची खातरजमा केली. त्यानंतर याप्रकरणी २४ आॅक्टोबर रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम तसेच अनैसर्गिक अत्याचार आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकाराची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अश्लिनी राउत यांच्या पथकाने आरोपीला २४ आॅक्टोबर रोजी पहाटे अटक केली. त्याला ३१ आॅक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला १३ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

Web Title: Shocking! Man arrested for sexually abusing a minor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.