धक्कादायक! चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 10:04 PM2020-02-10T22:04:50+5:302020-02-10T22:14:26+5:30

एका पाचवर्षीय मुलीवर १२ आणि १५ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची भिवंडी येथील बालसुधारगृहात रवानगी केली आहे.

Shocking! Minor girl sexually assaults by two minors | धक्कादायक! चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हे दाखल

कासारवडवली पोलिसांनी केली कारवाई

Next
ठळक मुद्देभिवंडीच्या बालसुधारगृहात केली रवानगीनागरिक संतप्तकासारवडवली पोलिसांनी केली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : घोडबंदर रोड भागात एका पाचवर्षीय मुलीवर १२ आणि १५ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची भिवंडी येथील बालसुधारगृहात रवानगी केली आहे. या प्रकरणाची महाराष्टÑ नवनिर्माण सेनेनेही गंभीर दखल घेतली असून पीडित मुलीवर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
कासारवडवली भागात राहणाºया १२ आणि १४ वर्षीय दोन मुलांनी त्याच परिसरातील एका पाचवर्षीय मुलीला खेळायला जाण्याचे आमिष दाखवून ४ फेब्रुवारी रोजी नजीकच्या झाडाझुडुपांमध्ये नेऊन आपसात संगनमत करून दुपारी १ ते २ वाजण्याच्या सुमारास तिच्यावर अत्याचार केले. या प्रकाराबाबत घरात किंवा कोणालाही काहीएक न सांगण्याचीही त्यांनी तिला धमकी दिली. ही बाब पीडितेने आपल्या पालकांना सांगितल्यानंतर तिला तातडीने तिच्या आईने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी तिची रुग्णालयात जाऊन विचारपूस केल्यानंतर लैंगिक अत्याचार तसेच पोक्सोप्रमाणे दोन्ही अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला. बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्यांची ही दोन्ही मुले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांना त्याच परिसरातून ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना भिवंडी येथील बालन्यायालयात हजर केले. या न्यायालयाने त्यांना बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
*मनसेने घेतली माहिती
मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह पदाधिकाºयांनी सोमवारी जिल्हा रुग्णालयात जाऊन या मुलीच्या उपचाराची रुग्णालय प्रशासनाकडून माहिती घेतली. तिची प्रकृती सुधारत असून तिला बरे वाटल्यानंतर तिला रुग्णालयातून सोडण्यात येईल, असे ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: Shocking! Minor girl sexually assaults by two minors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.