धक्कादायक! शेजाऱ्याने मारला दागिन्यांवर डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 01:20 AM2021-05-27T01:20:23+5:302021-05-27T01:22:30+5:30

वागळे इस्टेट, नेहरूनगर येथील एक गृहिणी किराणा माल आणण्यासाठी घराबाहेर पडल्याची संधी साधत तिच्या घरासमोर राहणाऱ्या राजू रसाळे याने तिच्या घरातील ८७ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने आणि काही रोकड असा एक लाख १८ हजार ५०० रुपयांचा ऐवज घेऊन पलायन केल्याची घटना नुकतीच घडली.

Shocking! The neighbor hit the jewelry | धक्कादायक! शेजाऱ्याने मारला दागिन्यांवर डल्ला

एक लाख १८ हजारांचे दागिने, रोकड लंपास

Next
ठळक मुद्देठाण्यातील घटनाएक लाख १८ हजारांचे दागिने, रोकड लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वागळे इस्टेट, नेहरूनगर येथील एक गृहिणी किराणा माल आणण्यासाठी घराबाहेर पडल्याची संधी साधत तिच्या घरासमोर राहणाऱ्या राजू रसाळे याने तिच्या घरातील ८७ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने आणि काही रोकड असा एक लाख १८ हजार ५०० रुपयांचा ऐवज घेऊन पलायन केल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी मंगळवारी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
वागळे इस्टेट नेहरूनगर रोड क्रमांक १८ येथे दत्तात्रय कांबळे हे वास्तव्याला आहेत. त्यांच्याच घरासमोर रसाळे हा बिगारी कामगार राहतो. दत्तात्रय यांची पत्नी सोमवारी सायंकाळी किराणा खरेदीसाठी दुकानात गेली होती. त्याचदरम्यान, राजू याने तिच्या घरात वरील बाजूने जिन्यावरून शिरकाव केला. त्यावेळी दत्तात्रय यांच्या मुलीला संशय आल्यामुळे ती लगोलग खालच्या खोलीत बसलेल्या तिच्या वडिलांना हा प्रकार सांगण्यासाठी आली. तोपर्यंत राजूने रोकड आणि दागिन्यांसह एक लाख १८ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास करून तिथून पलायन केले. या प्रकरणाच्या तपासासाठी दोन पथके नेमली असून, सहायक पोलीस निरीक्षक ए. टी. पवार हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Shocking! The neighbor hit the jewelry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.