धक्कादायक! मुंबईतून नगरकडे जाणाऱ्या कोरोना संशयितांची कार ठाण्याच्या सीमेवर पोलिसांनी पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 12:01 AM2020-04-10T00:01:46+5:302020-04-10T00:15:37+5:30
कोरोनाच्या संसर्गामुळे घाटकोपर येथील एका महिलेचा दोन दिवसांपूर्वी मृत्यु झाला होता. तिच्या संपर्कातील तिच्या मुलासह चौघेजण चक्क अहमदनगरकडे एका कारमधून पळून जात असतांनाच त्यांना मुरबाडजवळ ९ एप्रिल रोजी दुपारी चाणाक्ष ठाणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणो: कोरोनाचे संशयित असलेल्या चौघांना घेऊन जाणारी एक कार ठाणे ग्रामीण पोलिसांनी मुरबाडच्या सीमेवर गुरु वारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास पकडली. या कारसह चौघांनाही ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या कारमधून प्रवास करणाºया मुलांच्या आईचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले आहे. या चौघांमध्ये दोन महिला आणि दोन पुरु षांचा समावेश आहे. हे चौघेही कोरोना संशयित असून ते ‘हायरिस्क कॉन्टॅक्ट’मधील असल्याचेही त्यांना माहित होते. त्यांच्यात कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळल्यामुळे त्यांना रु ग्णालयात दाखल होण्यास मुंबईतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले होते, अशी प्राथमिक माहिती ठाणे ग्रामीण पोलिसांच्या चौकशीमध्ये समोर आली. तरीही ते घाटकोपर येथून अहमदनगरकडे पळून जात होते. ते टोकावडे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक खरमाटे यांच्या पथकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांच्या कारला ताब्यात घेऊन पुन्हा घाटकोपर पोलिसांकडे त्यांना देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आता त्यांच्या वैद्यकीय तपासणीबरोबरच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई देखिल केली जाणार आहे. घाटकोपर इथेच त्यांची चौकशी करून त्यांना तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. दक्ष ठाणे ग्रामीण पोलिसांनी वेळीच दखल घेऊन त्यांच्या कारला मुरबाड सीमेवर रोखल्याने ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादूर्भाव होण्यापासून रोखल्याची माहिती पोलिसांनी दिली.
‘‘ अशा प्रकारे कोरोना संदर्भातील लक्षणे आढळून आल्यास तसेच हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये आले असल्यास विनाकारण पळून न जाता त्याबाबत संबंधित वैद्यकीय अधिकारी किंवा संबंधित अधिकारी यांना माहिती देऊन स्वत:ची चाचणी करुन घ्यावी. यातूनच कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यास प्रशासनाला सहकार्य करावे.’’
डॉ. शिवाजी राठोड, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण
--