धक्कादायक ! लैंगिक अत्याचार करुन खंडणी उकळणारा पोलिसांचा खबरी जेरबंद
By जितेंद्र कालेकर | Published: January 12, 2020 09:13 PM2020-01-12T21:13:39+5:302020-01-12T21:40:10+5:30
मुंब्रा येथील एका तरुणीवर लैंगिक अत्याचार करुन तिचे विवस्त्र अवस्थेतील अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून साडे तीन लाखांची खंडणी उकळणाऱ्या सोहेल राजपूत याला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. एक वर्षांपूर्वीही व्यापा-याच्या मुलाचे खंडणीसाठी अपहरण केल्याप्रकरणी त्याला ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: लैंगिक अत्याचार करुन साडे तीन लाखांची खंडणी उकळणा-या सोहेल राजपूत (२४, रा. राबोडी, २, ठाणे) या पोलिसांच्या कथित खबºयाला कासारवडवली पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. संबंधित पिडित तरुणीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची तसेच तिला अॅसिड टाकून ठार मारण्याचीही धमकी त्याने दिली होती.
मुंब्रा परिसरातील रहिवाशी असलेली २२ वर्षीय पिडित तरुणीची आणि सोहेलची एका कार्यक्रमात तिच्या मैत्रिणीमार्फत ओळख झाली होती. याच मैत्रितून पुढे त्याने तिला लग्नाचे अमिष दाखवत तिच्यावर वारंवार ठाण्यातील घोडबंदर रोडवरील एका हॉटेलमध्ये लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार ३ एप्रिल २०१८ ते ८ जानेवारी २०१९ या दहा महिन्यांच्या कालावधीत सुरु होता. याच काळात त्याने तिचे काही अश्लील फोटो काढून ते प्रसारित करण्याची धमकी देत तिला पैशांसाठी ब्लॅकमेल केले. त्याद्वारे तिच्या बँक खात्यातून दीड लाख रुपये आणि दोन लाख रुपये अशी साडे तीन लाखांची खंडणी वसूल केली. याच काळात त्याने तिचा दोन महिन्यांचा गर्भपातही घडवून आणला. त्यानंतरही तिला शिवीगाळ करुन तिच्या अंगावर अॅसिड टाकून ठार मारण्याची धमकी दिली. कहर म्हणजे तिला त्याने अनेकदा बेल्टनेही मारहाण केली. या सर्व प्रकाराला कंटाळून तिने अखेर याप्रकरणी ८ जानेवारी रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचार, खंडणी उकळणे, मारहाण करणे, शिवीगाळ करणे तसेच धमकी दिल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एस. एच. चौगुले यांच्या पथकाने सोहेल याला ८ जानेवारी रोजी अटक केली. त्याला १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
यापूर्वी खंडणीसाठी नंदूरबारच्या व्यावसायिकाचे केले होते अपहरण
एका महिलेला हाताशी धरु न नंदूरबारच्या व्यावसायिकाला ब्लॅकमेल करीत त्याचे अपहरण करु न त्याच्याकडून दोन लाखांची खंडणी उकळून आणखी दहा लाखांची मागणी केल्याप्रकरणी सोहेल पंजाबी उर्फ सोहेल राजपूत आणि वर्तकनगर पोलीस ठाण्याचा पोलीस कॉन्स्टेबल दीपक वैरागड (33) या दोघांना १० जुलै २०१८ रोजी ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती. त्यांनी ओलीस ठेवलेल्या व्यापा-याच्या मुलाचीही त्यांच्या तावडीतून सुखरु प सुटका करण्यात आली होती. या अपहरण, खंडणी आणि ब्लॅकमेलिंगच्या काळया व्यवहारात ठाणे शहर पोलिसांच्या कार्यक्षेत्रतील एक पोलीस शिपाई अडकल्याने संपूर्ण ठाणे पोलीस वर्तूळात एकच खळबळ उडाली होती. नंदूरबार जिल्हयातील अक्कलकुवा येथील रिजवान मेमन याला खंडणीसाठी अपहरण केल्याची तक्र ार त्याच्या पित्याने ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे केल्यानंतर काशीमीरा आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी केलेल्या चौकशीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे आणि सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या पथकाने त्या दीपक वैरागड आणि सोहेल राजपूत या दोघांना अटक केली होती.
पोलिसांकडे खबरी म्हणून करतो काम
ठाणे शहर पोलिसांच्या वेगवेगळया पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हेगारी जगतातली टीप देण्याचे काम सोहेल करीत असल्यामुळे त्याची अनेक पोलीस अधिकाºयांकडे उठबस आहे. याच ओळखीतून आपल्यावर कोणीही कारवाई करणार नाही, असा सोहेलचा समज होता. यातूनच त्याच्या खंडणी आणि धमकी देण्याच्या कारवाया सुरु होत्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.