धक्कादायक! ठाण्यात भावजयीच्या वादात मध्यस्थी करणाऱ्या भावाचा खून करणाºया निवृत्त पोलीस जमादार दीराला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 11:20 PM2021-01-07T23:20:37+5:302021-01-07T23:23:14+5:30
घराचा ताबा मागणाºया भावजयीवर चाकूचे वार केल्यानंतर यात मध्यस्थी करणाºया अजय बाळा कर्डक (२८, रा. उल्हासनगर) या चुलत भावाचा चाकूचे वार करुन खून करणाºया निवृत्त पोलीस जमादार महेंद्र कर्डक (५५) याला श्रीनगर पोलिसांनी बुधवारी रात्री मोठया शिताफीने अटक केली. या धक्कादायक घटनेने ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : घराचा ताबा मागणाºया भावजयीवर चाकूचे वार केल्यानंतर यात मध्यस्थी करणाºया अजय बाळा कर्डक (२८, रा. उल्हासनगर) या चुलत भावाचा चाकूचे वार करुन खून करणाºया निवृत्त पोलीस जमादार महेंद्र कर्डक (५५) याला श्रीनगर पोलिसांनी बुधवारी रात्री मोठया शिताफीने अटक केली. त्याचवेळी खूनी हल्ला झालेल्या नीता कर्डक हिला तातडीने रुग्णालयात दाखल करुन तिचेही प्राण वाचविले आहे.
ठाणे शहर पोलीस दलातील हवालदार राजन कर्डक यांचा २०१८ मृत्यु झाला होता. त्यांच्या मृत्युनंतर त्याच्या घराचा ताबा हा त्यांचा भाऊ निवृत्त पोलीस जमादार महेंद्र कर्डक यांच्याकडे होता. पतीच्या निधनानंतर गेली अनेक दिवस आपल्या घराचा ताबा मिळविण्यासाठी नीता या दीर महेंद्र यांच्याकडे पाठपुरावा करीत होत्या. ६ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास त्या किसननगर येथील विजय सदन येथील महेंद्र यांच्याकडून आपल्या घराचा ताबा घेण्यासाठी पुन्हा चुलत दीर अजय कर्डक (२८) आणि अन्य एक नातेवाईक शंकर मालविया यांच्यासह गेल्या. त्यावेळी त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. यातूनच महेंद्र याने घरातील सुरीने नीताच्या गळयावर वार केले. त्याच दरम्यान श्रीनगर पोलिसांना या भांडणाची माहिती मिळाली. हा हल्ला झाल्यानंतर बिट मार्शल मुंकूंद राठोड आणि सुनिल धोंडे तिथे पोहचले. त्यावेळी रक्तबंभाळ अवस्थेमध्ये तिथून बाहेर पडलेल्या नीता यांच्या गळयाला ओढणीने बांधून राठोड यांनी त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात नेले. तर धोंडे यांनी हल्लेखोराचा शोध घेतला. तोपर्यंत त्याने या भांडणात मध्यस्थी करणाºया अजय यांच्यावरही चाकूने वार केले. त्यानंतर तो स्वत:वर वार करण्याची धमकी देत होता. अजय हा देखिल रक्ताच्या थारोळयात पडला होता. धोंडे यांनी स्वत:चे कौशल्य वापरून महेंद्रच्या हातातील चाकू काढला. नंतर स्थानिकांच्या मदतीने त्याला पोलीस ठाण्यात नेले. जखमी अजयला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार राठोड आणि धोंडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत या महिलेचे प्राण वाचविले. तसेच आत्महत्येचा प्रयत्न करणाºया आरोपीलाही अटक केल्याबद्दल पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी त्यांचे कौतुक केले.