धक्कादायक! ठाण्यात एकाच दिवसात रिक्षातील चौघा प्रवाशांचे मोबाइल हिसकावून दोघांचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 10:48 PM2019-02-14T22:48:39+5:302019-02-14T23:07:54+5:30

एरव्ही, पायी जाणाऱ्या महिलांना हेरुन त्यांचे मंगळसूत्र किंवा मोबाईल हिसकावण्याचे प्रकार सर्रास घडत होते. आता रिक्षातून जाणाºया प्रवाशांनाही चोरटयांनी लक्ष केले असून बुधवारी एकाच दिवसात अवघ्या दोन तासांच्या अंतराने चार प्रवाशांचे मोबाईल हिसकावल्याची घटनांनी भीतीचे वातावरण पसरले आहे.

Shocking! In the same day in Thane, the passengers of the four passengers in the auto rickshaw grabbed and both of robber fled | धक्कादायक! ठाण्यात एकाच दिवसात रिक्षातील चौघा प्रवाशांचे मोबाइल हिसकावून दोघांचे पलायन

नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्दे राममारुती रोड ते नितीन कंपनीपर्यंतच्या परिसरातील घटनाअवघ्या दोन तासांच्या अंतराने घडले प्रकारनौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे : रिक्षातून प्रवास करणा-या ललित पांडे (२८, घाटकोपर, मुंबई) या खासगी कंपनीतील व्यवस्थापकासह चौघांचे एक लाखांचे चार मोबाइल बुधवारी एकाच रात्रीत अवघ्या काही तासांच्या अंतराने जबरीने चोरल्याची घटना घडल्या. याप्रकरणी चौघांनी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
बोरिवलीतील एका नामांकित कंपनीमध्ये क्षेत्रीय व्यवस्थापक म्हणून नोकरी करणारे पांडे हे १३ फेब्रुवारी रोजी रात्री १०.५० वाजताच्या सुमारास माजिवडा येथून नाशिक-मुंबई राष्टÑीय महामार्गावरून शेअर रिक्षाने तीनहातनाका येथे जात होते. रिक्षा कोरम मॉलसमोर आली असता, त्यांच्या पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्याने ललित यांच्या हातातील २५ हजारांचा मोबाइल जबरीने हिसकावून पळ काढला. दुस-या घटनेमध्ये कळवा, खारेगाव भागात राहणा-या आलेख्या डोंटा (३०) या अंधेरी येथून रिक्षाने बुधवारी रात्री ९.५० वा.च्या सुमारास घरी येत असताना त्यांच्याकडील ३५ हजारांचा मोबाइल दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी हिसकावून पलायन केल्याची घटना कोरम मॉलसमोर घडली. अन्य एका घटनेत युलेरी सल्डान्हा (२२, रा. हायवे आशीर्वाद, नितीन कंपनी, ठाणे) ही तरुणी रिक्षाने मुंबई-नाशिक मार्गाने रात्री १२ वा.च्या सुमारास घरी जात होती. त्यावेळी कोरम मॉलसमोर त्याची रिक्षा आली, तेव्हा मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी तिचा २५ हजारांचा मोबाइल असलेली पर्स हिसकावली. असाच प्रकार अभिषेक निकम (२६, रा. यशोधननगर, ठाणे) यांच्याही बाबतीत घडला. १३ फेब्रुवारी रोजी निकम हे रात्री ११.५० वा.च्या सुमारास ठाणे स्टेशन येथून शेअरिंग रिक्षाने घरी जात होते. ते राममारुती रस्त्याने नौपाडा भागातून जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्याने त्यांच्या हातातील १५ हजारांचा मोबाइल हिसकावून पलायन केले. निकम यांनी काही अंतरावर या मोटारसायकलस्वारांचा पाठलागही केला. परंतु, या रिक्षाला चकवा देऊन ते लुटारू पसार झाले. या चारही तक्रारदारांनी १४ फेब्रुवारी रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात जबरी चोरीची तक्रार दाखल केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संजय धुमाळ यांचे पथक याप्रकरणी तपास करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Shocking! In the same day in Thane, the passengers of the four passengers in the auto rickshaw grabbed and both of robber fled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.