धक्कादायक ! सलग दुसऱ्या दिवशीही घोडबंदर रोडवरील अपघातात दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 12:47 AM2020-06-15T00:47:38+5:302020-06-15T01:07:33+5:30

दूधाची विक्री आणि पुरवठा करणा-या दोन मित्रांना दुचाकीवरुन जातांना काळाने गाठल्याची धक्कादायक घटना ठाण्यात रविवारी घडली. मानपाडयाहून ठाण्याच्या दिशेने मोटारसायकलवरुन जाणा-या शुभम जगदाळे आणि आदित्य शर्मा या दोघांना एका अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचाही मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Shocking! For the second day in a row, both died in an accident on Ghodbunder Road | धक्कादायक ! सलग दुसऱ्या दिवशीही घोडबंदर रोडवरील अपघातात दोघांचा मृत्यू

मृतांमध्ये दूध विक्रेत्यांचा समावेश

Next
ठळक मुद्दे मोटारसायकलीला अज्ञात वाहनाची पाठीमागून  धडक मृतांमध्ये दूध विक्रेत्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: घोडबंदर रोडवरील दुचाकीच्या अपघातात शुभम रवींद्र जगदाळे (१७, रा. मानपाडा, ठाणे) आणि आदित्य अशोक शर्मा (१७, रा. शिवाजीनगर, ठाणे) या दोन दूध विक्रेत्या मित्रांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. शनिवारीही याच ठिकाणी झालेल्या एका कार अपघातामध्ये एकाचा मृत्यु झाला होता. रविवारी शुभमच्या दुचाकीला कोणत्या वाहनाने धडक दिली, याचा शोध घेण्यात येत असल्याचे कापूरबावडी पोलिसांनी सांगितले.
शुभम चालवित असलेल्या दुचाकीवरुन त्याचा मित्र आदित्य असे दोघेजण घोडबंदर रोडमार्गे १४ जून रोजी सकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास मानपाडा ते ठाण्याच्या दिशेने प्रवास करीत होते. कापूरबावडी येथील विहंग हॉटेलजवळ एका अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला दिलेल्या जोरदार धडकेत शुभम आणि आदित्य दूरवर फेकले गेले. यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्याच एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांना धडक देणा-या वाहनाचा शोध घेण्यात येत आहे. सलग दूस-या दिवशी त्याच मार्गावर त्याचठिकाणी झालेल्या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. सहायक पोलीस निरीक्षक बी. सी. वंजारे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Shocking! For the second day in a row, both died in an accident on Ghodbunder Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.