धक्कादायक! ठाण्यात व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवून सुरु होते सेक्स रॅकेट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 11:21 PM2021-06-22T23:21:45+5:302021-06-22T23:23:42+5:30

व्हॉटसअ‍ॅपवर तरुणींचे फोटो पाठवून त्यांच्याकडून शरीरविक्रीयाचा व्यवसाय करुन घेणाºया पप्पूकुमार यादव (२६, रा. ठाणे) या दलालास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने मंगळवारी अटक केली.

Shocking! The sex racket starts by posting photos on WhatsApp in Thane | धक्कादायक! ठाण्यात व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवून सुरु होते सेक्स रॅकेट

अनैतिक व्यवसाय करणाऱ्या दलालास अटक

googlenewsNext
ठळक मुद्देअनैतिक व्यवसाय करणाऱ्या दलालास अटकदोन तरुणींची सुटकाठाणे गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: व्हॉटसअ‍ॅपवर तरुणींचे फोटो पाठवून त्यांच्याकडून शरीरविक्रीयाचा व्यवसाय करुन घेणाºया पप्पूकुमार यादव (२६, रा. ठाणे) या दलालास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने मंगळवारी अटक केली. त्याच्या तावडीतून दोन पिडित तरुणींची सुटकाही करण्यात आली आहे.
ठाण्यातील कासारवडवली, आनंदनगर बस डेपोजवळ एक व्यक्ती दोन तरुणींना शरीर विक्रयासाठी घेऊन येणार असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या कक्षाला मिळाली होती. याच माहितीच्या आधारे या पथकाने एका बनावट गिºहाईकाच्या मदतीने काही पंचासह मंगळवारी सायंकाळच्या सुमारास धाड टाकली. त्यावेळी तिथे त्याने आणलेल्या दोन तरुणींची या पथकाने सुटका केली. त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात येणार आहे. आॅर्केस्ट्रा बारमध्ये काम करणाºया तरुणींना काही पैशांचे अमिष दाखवून त्यांच्याकडून यादव हा गेल्या काही महिन्यांपासून अनैतिक व्यवसाय करुन घेत होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांच्या पथकाने ही कारवाई केली. कासारवडवली पोलीस ठाण्यात याप्रकरणी पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Shocking! The sex racket starts by posting photos on WhatsApp in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.