धक्कादायक, सोशल डिस्टंसिंगची ऐशी तैशी, ठाण्यात पसरतेय घाणीचे साम्राज्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 11:16 AM2020-05-20T11:16:50+5:302020-05-20T11:16:50+5:30
अनेकदा हजारोंच्या संख्येने एकाच जागी लोक जमा होत सोशल डिस्टंसिंगचे तोडल्याचे अनेक प्रकार समोर आले असताना आता ठाण्यातील हे चित्र पाहून तुम्हालाही नक्कीच राग येईल.
गेल्या 55 दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी सुरुवात झाली. लॉकडाऊनमध्येही कामगारांना पायपीट न करता सुरक्षितरीत्या त्यांच्या गावी जाण्याचीही सोय शासनाकडून करण्यात आली. ठराविक वेळेत मुंंबई शहरातून विशेष रेल्वे गाड्या आणि बससेवा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र लोकांना सद्यस्थितीचे जराही गांभीर्य नसल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. अनेकदा हजारोंच्या संख्येने एकाच जागी लोक जमा होत सोशल डिस्टंसिंगचे तोडल्याचे अनेक प्रकार समोर आले असताना आता ठाण्यातील हे चित्र पाहून तुम्हालाही नक्कीच राग येईल.
माजीवाडा, कॅटबरी जंक्शन, मुंब्रा टोल येथून कामगारांना त्यांच्या इच्छीत स्थळी पोहचवण्यासाठी बससेवा सुरू झाली. मात्र रोज सकाळी हजारोंच्या संख्येने कामगार अशा प्रकारे गर्दी करत सोशल डिस्टंसिंगचे नियम तोडत आहेत. इतकेच नाही तर पाण्याच्या बाटल्या, केळ्यांची टरफल अशा प्रकारे कचरा फेकून परिसर अस्वच्छ करत असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे.
कोरोना वॉरिअर म्हणून संबोधले जाणारे सफाई कामगारांना रोज अशाप्रकारे ठाण्यातील विविध परिसरातून कचरा साफ करावा लागत आहे. स्वच्छ राहा, परिसर स्वच्छ ठेवा असे सांगून आता प्रत्येकाच्याच घशाला कोरड पडली असताना.अशा काही बेजाबदार लोकांना फक्त स्वतःचीच काळजी असल्याचे वास्तव समोर आले आहे.