धक्कादायक! ५० लाखांच्या खंडणीसाठी रिव्हॉल्व्हरच्या धाकावर शेअर दलालाचे अपहरण: दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 01:03 AM2020-10-29T01:03:14+5:302020-10-29T01:05:58+5:30
शेअर बाजारात गुंतवणूक केलेली रक्कम वसुलीसाठी आलेल्या गुंडांनी रिव्हॉल्व्हरच्या धाकावर नवी मुंबईतील एका ४० वर्षीय शेअर दलालाचे अपहरण केले. नंतर त्याला ठार मारण्याची धमकी देत ५० लाखांची मागणी करुन त्याच्याकडे पाच लाख रुपये उकळणाऱ्या रोहीत कांबळे आणि किशोर आढाव या सराईत गुंडांना पाठलाग करुन कोपरी पोलिसांनी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: शेअर बाजारात गुंतवणूक केलेली रक्कम वसुलीसाठी आलेल्या गुंडांनी रिव्हॉल्व्हरच्या धाकावर नवी मुंबईतील एका ४० वर्षीय शेअर दलालाचे अपहरण केले. नंतर त्याला ठार मारण्याची धमकी देत त्याच्याकडे ५० लाखांची मागणी करुन पाच लाख रुपये उकळणाºया रोहीत कांबळे आणि किशोर आढाव या सराईत गुंडांना पाठलाग करुन अटक केल्याची माहिती कोपरी पोलिसांनी बुधवारी दिली. यातील अन्य दोघांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नवी मुंबईत वास्तव्यास असलेल्या या शेअर दलालाचे ठाण्याच्या कोपरीमध्ये कार्यालय आहे. त्यांनी नेमलेल्या दलालांमार्फतीने अनेक गुंतवणूकदारानी शेअर्स बाजारात गुंतवणूक केली होती. या गुंतवणूकदारांमध्ये प्रथमेश मोहिते यांनी सप्टेंबर 2019 ते फेब्रुवारी 2020 पर्यंत एकुण 92 लाखांची गुंतवणूक केली होती. त्यांनाही त्याचा परतावा देण्यात आला होता. मात्र, मार्च माहिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु झाले. त्यामुळे शेअर बाजार कोसळला. यात गुतवणूकदारांचा दरमहा मिळणारा परतावा बंद झाला. यातूनच मोहितेसह काही जणांनी शेअर दलालाला मे महिन्यामध्ये सानपाडा येथे बोलविले. शेअर बाजारातील मंदी उठल्यानंतर सर्वांचा परतावा देतो, असेही या दलालाने त्यांना सांगितले. यातील प्रथमेशने ताबडतोब पैसे देण्याची धमकी दिली. तेंव्हा ४० लाख रुपये टप्याटप्याने तर उर्वरित रक्कम पाच ते सहा महिन्यांनी देतो, असे या दलालाने सांगितले. मात्र, 23 आॅक्टोबर रोजी किशोर आढाव याच्यासह चौघांनी दलालाचे ठाण्यातील कार्यालयात त्याला गाठले. आम्हाला प्रथमेश मोहिते यांनी पाठविल्याचे सांगत या दलालाच्या डोक्यावर रिव्हॉल्वर रोखून तू त्यांचे घेतलेले पैसे दे, ‘ हमारे इजाजत के बिगर तु कैसा धंदा करता है,’ ‘अभी हमको 50 लाख रु पये दे नही तो जानसे मार दुंगा’ अशी धमकी देऊन रिव्हॉल्वरची मूठ त्याच्या खांद्यावर मारून त्याला एका वाहनातून त्याच्या घरी घेऊन नेले. घरातून पाच लाख रु पये घेऊन नंतर महिन्याला दोन लाख रुपये देण्याच्या अटीवर सोडले.
याप्रकरणी २४ आॅक्टोबर रोजी त्याने कोपरी पोलीस ठाण्यात तक्र र दाखल केली. पोलिसांनी २५ आॅक्टोबर रोजी या दलालाच्या कार्यालयाजवळ सापळा रचून हप्त्याची रक्कम घेण्यासाठी आलेल्या रोहीत आणि त्याचा साथीदार किशोर याला पाठलाग करुन अटक केली. त्यांच्या इतर साथीदारांचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांनी सांगितले.