धक्कादायक! आर्थिक विवंचनेतून ठाण्यात तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 10:07 PM2020-10-27T22:07:40+5:302020-10-27T22:16:11+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे गेल्या अनेक दिवसांपासून काम न मिळाल्यामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या मयुर निजामपुरकर याने २७ आॅक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: आर्थिक विवंचनेतून मयूर निजामपूरकर (२६, रा. पातलीपाडा, घोडबंदर रोड, ठाणे) तरुणाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे गेल्या अनेक दिवसांपासून काम न मिळाल्यामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या मयुरने २७ आॅक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. पातलीपाडा येथील वडके निवास येथील आपल्या घरातील छताला साडीने गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याच्या कुटूंबियांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. केसरे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.