धक्कादायक! ठाण्यात चालत्या कारवर झाड कोसळले: कारमधील डॉक्टरची सुखरुप सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 00:06 IST2021-05-17T23:44:37+5:302021-05-18T00:06:48+5:30
तौक्ते चक्र ीवादळाच्या तडाख्यामुळे ठाण्यात चालत्या मोटार कारवर झाड कोसळल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर तातडीने धाव घेत ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांसह ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या पथकांनी या कारमधील डॉ. रितेश गायकवाड (४५, रा. ठाणे) यांची सुखरुप सुटका केली.

ठाणे अग्निशमन दलाची कामगिरी
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: तौक्ते चक्र ीवादळाच्या तडाख्यामुळे ठाण्यात चालत्या मोटार कारवर झाड कोसळल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर तातडीने धाव घेत ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांसह ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या पथकांनी या कारमधील डॉ. रितेश गायकवाड (४५, रा. ठाणे) यांची सुखरुप सुटका केली.
नौपाडा पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडियाजवळील रस्त्यावरुन गोडबोले रुग्णालयाकडे जात असलेल्या चालत्या मोटारकारवर हे झाड अचानक कोसळले. ही घटना इतकी इचानक घडली की, मोटारीतील डॉ. रितेश यांना बाहेरही पडता आले नाही. यात ते चांगलेच अडकले. ही माहिती मिळताच ठाणे अग्निशमन दलाच्या एका इंजिनसह जवानांनी तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागातील कक्षाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने याठिकाणी बचावकार्य केले. या मोटारकारमध्ये अडकलेल्या डॉ. रितेश यांची अर्ध्या तासांच्या अंतराने सुखरुप सुटका करण्यात आली. या अपघातामध्ये जखमी झाल्यामुळे त्यांना जवळच्याच एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर या मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, नौपाडा पोलिसांनी ही कोंडी दूर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.