धक्कादायक! ठाणे शहरात २४ तासांमध्ये दोघांच्या सोनसाखळयांची जबरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 11:19 PM2020-06-22T23:19:45+5:302020-06-22T23:25:18+5:30

ठाण्यात लॉकडाऊनचे नियम शिथिल होताच आता सोनसाखळी चोरटयांनीही डोके वर काढले आहे. अवघ्या २४ तासांमध्येच एका महिलेसह दोघांच्या सोनसाखळया जबरीने हिसकावल्याच्या घटना शहरातील वेगवेगळया भागांमध्ये घडल्या. नाकाबंदीमधील पोलिसांची संख्या कमी झाल्यामुळे आता या घटनांमध्येही वाढ होऊ लागल्याने चिंता व्यक्त होत आहे.

Shocking! Two Robbery of gold chains in Thane city within 24 hours | धक्कादायक! ठाणे शहरात २४ तासांमध्ये दोघांच्या सोनसाखळयांची जबरी चोरी

नाकाबंदीमधील पोलिसांची संख्या कमी झाल्याचा परिणाम

Next
ठळक मुद्देचोरटयांचेही संपले ‘लॉकडाऊन’नाकाबंदीमधील पोलिसांची संख्या कमी झाल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेली नाकाबंदी आता अनेक ठिकाणी शिथिल झाली आहे. याचाच फायदा घेत चोरटयांनीही त्यांचे लॉकडाऊन संपविले असून अवघ्या २४ तासांच्या अंतरामध्ये ठाणे शहरात एका महिलेसह दोघांच्या सोनसाखळया लांबविल्याच्या घटना घडल्या. याप्रकरणी वर्तकनगर आणि नौपाडा या दोन पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरीच्या गुन्हयांची नोंद शनिवारी आणि रविवारी झाली आहे.
गेली सुमारे अडीच महिने सुरु असलेली संचारबंदी शिथिल झाली आहे. त्यामुळे कंटेनमेंट झोनमधील काही तुरळक पोलीस आणि राज्य राखीव दलाचे पोलीस वगळता अनेक ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदीचे पॉईन्ट कमी केले आहेत. एरव्ही, नाकाबंदी आणि गस्तीचे प्रमाण अधिक असल्यामुळे सोनसाखळी चोरटे चोरीसाठी धजावत नव्हते. आता रस्त्यावरील पोलिसांची संख्या कमी होताच हे गुन्हेही दाखल होऊ लागले आहेत. देवदयानगर येथील रहिवाशी संतोष जोशी (४८) हे २१ जून रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास वर्तकनगर येथील साई मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी पायी जात होते. शास्त्रीनगर येथे ते आले असता, मोटारसायकलवरुन तोंडाला मास्क लावून आलेल्या ३० ते ३५ वयोगटातील दोघांपैकी त्यांच्या गळयातील ५० हजारांची २० ग्रॅमची सोनसाखळी आणि दुसरी एक ४० हजारांची सोनसाखळी खेचून पलायन केले. याप्रकरणी त्यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याआधी स्मिता ठकार (५४, रा. पाचपाखाडी, ठाणे) ही महिला २० जून रोजी सकाळी ६ वा. च्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडली. ती ठाणे महापालिका मुख्य कार्यालयाजवळील संत ज्ञानेश्वर मार्गावरुन घरी जात असतांना मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा भामटयांनी त्यांचे ३५ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पलायन केले. याप्रकरणी त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात जबरी चोरीची तक्रार दाखल केली आहे.
* एक आठवडयापूर्वी राबोडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या साकेत मार्गावरही एका सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या महिला अधिकाºयाचीच सोनसाखळी खेचण्याचा दोघ्रांनी प्रयत्न केला होता. त्यानंतर या दोन घटना घडल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Web Title: Shocking! Two Robbery of gold chains in Thane city within 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.