धक्कादायक प्रकार; थर्टीफर्स्टला ध्वनिप्रदूषणाचे उल्लंघन, पोलिसांनी नोंदवला नाही गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2018 07:13 PM2018-01-01T19:13:36+5:302018-01-01T19:14:19+5:30
थर्टीफर्स्टच्या पार्ट्यांमध्ये मध्यरात्री बारा नंतर देखील ध्वनिक्षेपक सुरु असताना ध्वनिप्रदूषण कायद्याच्या उल्लंघनाची एकही नोंद शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये नाही
मीरा रोड - थर्टीफर्स्टच्या पार्ट्यांमध्ये मध्यरात्री बारा नंतर देखील ध्वनिक्षेपक सुरु असताना ध्वनिप्रदूषण कायद्याच्या उल्लंघनाची एकही नोंद शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये नाही. विशेषत: काशिमीरा व उत्तन परिसरात व्यावसायीक पार्ट्यांचे आयोजन मोठ्या प्रमाणात असताना पोलीसच आधी ध्वनीक्षेपक बंद करायला लाऊन नंतर ध्वनीमापक यंत्राने मोजणीचे नाटक करुन ध्वनीप्रदुषणच झाले नसल्याच्या नोंदी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. त्या बाबतचा व्हिडियोच हाती लागल्याने पोलीस व पार्टी चालकांचे लागेबांधे उघड झाले आहेत.
थर्टी फस्टच्या रात्री साठी ध्वनीक्षेपक अर्थात डिजे वा साऊंड वापरण्यासाठी रात्री १२ वाजे पर्यंत परवानगी देण्यात आली होती.
मीरा भाईंदर मध्ये थर्टी फस्ट च्या रात्री साठी उत्तन, चौक, काशिमीरा, चेणे, वरसावे, काजुपाडा आदि भागात अशा आलिशान पाटर्यांची रेलचेल होती. रिसॉर्ट, बार व हॉटेल तसेच अन्य आयोजकांनी मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचे आयोजन केले होते. अगदी हजार - दोन हजार पासुन ७ ते ८ हजार प्रती व्यक्तीसाठी प्रवेश शुल्क आकारण्यात आले. लेझर लाईट सह डिस्को लाईट तसेच डॉल्बी साऊंड सह डिजे आदी जय्यत आयोजन करण्यात आले होते.
परंतु शहरा सह उत्तन वा काशिमीरा भागात एकही ध्वनी प्रदुषण कायद्याचे उल्लंघन केल्याची घटनाच घडली नसल्याचे पोलीस ठाण्यां मधुन सांगण्यात आले. तर सर्रास मध्यरात्री १२ नंतर देखील उशीरा पर्यंत पार्ट्यां मध्ये डिजे आदीचा दणदणाट सुरु होता असा तक्रारींचा सुर देखील लावला जातोय.
सर्रास कायद्याचं उल्लंघन करुन वेळेची व आवाजाची मर्यादा सर्रास ओलांडताना पोलीसांना त्यातही गस्ती वरचे पोलीसांना हाताशी ठेवले जाते. तक्रार आली तरी तक्रारदाराची बोळवण करायची किंवा थोड्यावेळ बंद करुन वरिष्ठांना ध्वनीक्षेपक बंद असल्याचे सांगुन कटवले जाते.
दरम्यान उत्तनच्या वेलंकनी तिर्थ मंदिरा मागे समुद्र किनारी सीरआरझेड बाधीत चक्क सरकारी जमीनींवर थर्टी फस्टच्या पार्ट्या सर्रास रंगल्या होत्या. परीसरात देखील दणदणाट सुरु होता.
या ठिकाणी उत्तन पोलीसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस देखील तैनात करण्यात आले असताना सर्रास पार्ट्यां मध्ये डिजे व ध्वनीक्षेपकांचा वापर चालला होता.
तक्रारी नंतर ध्वनी मापक यंत्र घेऊन एका पार्टंच्या ठिकाणा जवळ पोलीस पथक आले खरे पण ते आत न जाता बाहेर लांबच थांबले. पोलीस येताच आयोजकाच्या कर्मचारयाने लगेच ध्वनीक्षेपक यंत्रणा बंद करा असा निरोप दुसरया कर्मचारयास दिला.
त्या नंतर त्या कर्मचारयाने पोलीस पथका जवळ जाऊन पोलीसाशी हात मिळवला. पोलीसाने कर्मचारयास आॅनलाईन असुन लोकेशन येते अशी माहिती दिली. तर दुसरया पोलीसाने ध्वनी प्रदुषणची एक केस करायची म्हणजे नाकीनऊ येते असे सांगत ध्वनीमापक यंत्र चालु केले आहे साऊंड बंद करायला सांगा असे कर्मचारयास सांगीतले. त्या नंतर ध्वनीमापक यंत्राने आवाजाची पातळी मोजण्याचे नाटक करुन पोलीस निघुन गेले.
ही सर्व घटनेची रॅकॉर्डिंग झाल्याने पोलीसांचा हा फंडा समोर आलाय. या वरुन ध्वनी प्रदुषण कायद्याच्या अमलबजावणी ऐवजी थर्टीफस्टच्या आयोजकांवर अर्थपुर्ण मेहरेनजर दाखवण्यात आल्याने एकही नोंद शहरात झाली नसल्याच्या आरोपांना बळ मिळाले आहे.