धक्कादायक ! वापरण्यात आलेले पीपीई किट उघड्यावर, कामगारांच्या जीवाला धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 07:16 PM2020-07-11T19:16:14+5:302020-07-11T19:17:09+5:30
संबंधितावर कठोर कारवाईची मागणी
डोंबिवली - येथील एमआयडीसी फेज २ मध्ये डोंबिवली नागरिक सहकारी बँक आणि दुर्वांकुर हॉलच्या मधला सर्व्हिस रोड वर मोठ्या प्रमाणात कोरोना व्हायरससाठी हॉस्पिटलमध्ये वापरले जाणारे पीपीई किट आणि इतर वापरलेले साहित्य (बायो मेडिकल वेस्टेज) मोठ्या प्रमाणात पोती भरून तेथे टाकले जात असल्याची माहिती दक्ष नागरिक मंगेश कोयंडे यांनी दिली.
कोण हे सगळे टाकत आहे माहीत नाही, पण संबंधित दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. आता तर हा व्हायरस संसर्ग हवेतून होत असल्याने त्याचा धोका वाढला आहे. ते जेथे टाकण्यात आले आहे, येथून बँकेच्या इकडचा हायवेला जोडणार रस्ता बंद असल्यामुळे खूप मोठ्याप्रमाणात वाहनं त्या अडमार्गे येत असतात. तसेच या जागेच्या आजूबाजूला खासगी कंपन्या, महावितरण आहे, त्यांच्या कर्मचाऱ्यांचा, सोनारपाडा, म्हात्रे पाडा, निवासी विभागातील लोकांचा वावर इथे असतो. त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो असे त्यांचे म्हणणे आहे. कल्याण डोंबिवली महानगपालिका आयुक्त, आरोग्य विभाग, पोलिस प्रशासाने या गंभीर समस्यकडे लक्ष घालावे आणि संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. त्याबाबतचे फोटो कोयंडे यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्यावर नागरिकांनी महापालिकेच्या सफाई विभागावर टीकेची झोड उठवली.