CoronaVirus News : व्यवसाय कसा करायचा, पुन्हा लॉकडाऊन वाढणार?, व्यापारी चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 01:30 PM2020-09-14T13:30:58+5:302020-09-14T13:31:22+5:30

कोरोना रुग्ण वाढत आहेत, हे जरी खरे असले तरीही कुटुंबाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि गरजा भागवण्यासाठी पैसा लागतोच. तो आणायचा कुठून? उठसूट व्यापारांवर बंदी आणुन रहाटगाडा कसा चालवायचा असा सवाल शहरातील व्यावसायिकांनी केला.

shopkeeper worried due to coronavirus lockdown in maharashtra | CoronaVirus News : व्यवसाय कसा करायचा, पुन्हा लॉकडाऊन वाढणार?, व्यापारी चिंतेत

CoronaVirus News : व्यवसाय कसा करायचा, पुन्हा लॉकडाऊन वाढणार?, व्यापारी चिंतेत

Next

डोंबिवली - कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता कटेंटमेंट झोनमधील दुकाने, व्यवहार पुन्हा सील करण्याचे मनपाचे नियोजन असून त्यामुळे शहरातील उद्योग, व्यापार करणाऱ्यांचीही चिंता वाढली आहे. आधीच सहा महिने व्यवसायावर पाणी फिरवले गेले, आता तर पुन्हा सील झाले तर मात्र चिंता वाढणार असून व्यापार करायचा कसा? असा पेच व्यापाऱ्यांसमोर आहे.

कोरोना रुग्ण वाढत आहेत, हे जरी खरे असले तरीही कुटुंबाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि गरजा भागवण्यासाठी पैसा लागतोच. तो आणायचा कुठून? उठसूट व्यापारांवर बंदी आणुन रहाटगाडा कसा चालवायचा असा सवाल शहरातील व्यावसायिकांनी केला. नागरिकांच्या सवयींवर निर्बंध आणणे गरजेचे असून ते एका रात्रीत होईल अशी अपेक्षा कशी केली जाऊ शकते? तसेच लॉकडाऊन केल्याने, ती संख्या अटोक्यात येत आहे असे कुठे आहे? या आधीही मार्च ते ऑगस्टपर्यंत कल्याण डोंबिवलीचे आकडे सरासरी ५०० रुग्णांच्या दरम्यानच आहेत. आठ दिवसात त्या खाली रुग्ण संख्या आलेली नाही, त्यामुळे मनपाने व्यापार उद्योग बंद ठेवला काय? सुरू ठेवला काय? यापेक्षा संख्या कमी करण्यावर भर द्यावा. व्यापार पूर्णत: ठप्प झाला असून दुकानदार, व्यावसायिक पुन्हा हिमतीने पुढे येत आहेत, त्यामुळे आता पुन्हा लॉकडाऊन अथवा ऐरीये सील केले तर मात्र आत्मविश्वासाने पुन्हा व्यवसाय सुरु करणे कठीण होणार असल्याने मनपा अधिका-यांनी पुन्हा एकदा सकारात्मक दृष्टीने नेमकी समस्या शोधावी, पण व्यापार बंद करू नये अशी मागणी जोर धरत आहे.

माझा मोटरवाहनांचे टायर, ट्यूब बदलणे, पंक्चर काढण्याचा व्यवसाय आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह यावर असून घरात वृद्ध आई, भाऊ यांचीही जबाबदारी आहे? ६ महिने कसे गेले ते आमच आम्हाला माहिती. आता कुठे व्यवसाय सुरु झाला असून मी माझ्याकडे येणाऱ्या ग्राहकांना सर्व नियम पाळावेत असे आवाहन करतो, तसेच वाहन ठेवून पुन्हा काही वेळाने यावे असे आवाहन करतो. वाहने सॅनिटाईज करूनच काम करतो, तसेच मास्क न लावणाऱ्यांना सेवा देत नाही. पण आता पुन्हा लॉकडाऊन करून अथवा एरीया सील करून रोजीरोटीची अडचण करू नका.

- प्रशांत चौधरी, पंक्चर काढणारा व्यावसायिक

महत्त्वाच्या बातम्या

"मुख्यमंत्र्यांनी ठाणे ग्रामीणच्या अत्यावश्यक सेवेतील कामगारांची केली घोर निराशा"

"बिहार निवडणूक येताच महाराष्ट्राच्या बदनामीचं कारस्थान सुरू, हा 'पॅटर्न' यशस्वी होणार नाही"

"कोरोनामध्ये आत्मनिर्भर व्हा, स्वतःचा जीव स्वतःच वाचवा कारण पंतप्रधान मोरासोबत व्यस्त आहेत"

"कोरोना किट खरेदीमध्ये करोडोंचा भ्रष्टाचार", आपचा योगी सरकारवर हल्लाबोल

"राज्यात भगिनींनी किती संताप, शोक व्यक्त करत बसायचंय, डोळ्यांसमोर महिलांना उद्ध्वस्त होताना पाहायचं?"

Web Title: shopkeeper worried due to coronavirus lockdown in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.