खारबावमध्ये पिस्टल बाळगणाऱ्यासह विक्रेत्यासही अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:30 PM2018-11-19T22:30:24+5:302018-11-19T22:33:45+5:30

भिवंडी : तालुक्यातील खारबाव गावात पिस्टल बाळगणारा व पिस्टलची विक्री करणाºयास पोलीसांनी अटक केली असुन त्यांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ...

The shopkeepers along with the pistol in Kharbaw are also arrested | खारबावमध्ये पिस्टल बाळगणाऱ्यासह विक्रेत्यासही अटक

खारबावमध्ये पिस्टल बाळगणाऱ्यासह विक्रेत्यासही अटक

Next
ठळक मुद्दे खारबाव पेट्रोल पंपाजवळ पिस्टलासह तरूणास अटक पिस्टल विकणा-या तरूणास खारबाव फाटकाजवळ अटकखारबावमध्ये पुर्वी दोघांना पिस्टल व काडतूसासह केली अटक

भिवंडी: तालुक्यातील खारबाव गावात पिस्टल बाळगणारा व पिस्टलची विक्री करणाºयास पोलीसांनी अटक केली असुन त्यांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश भिवंडी कोर्टाने दिले आहेत. गेल्या बारा दिवसांत पोलीसांनी बेकायदेशीर पिस्टल बाळगणाºया तीन जणांना खारबाव गावातून अटक केल्याने परिसरांत खळबळ माजली आहे.
खारबाव मधील पेट्रोल पंपाजवळ गावातील अभिजीत हरिश्चंद्र पाटील (२१)हा गावठी कट्ट्यासह फिरत असल्याची खबर पोलीसांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा लावून त्यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ देशी बनावटीचे मॅगझीनने भरलेली एक लोखंडी पिस्टल व एक काडतूस मिळाले. पोलीसांनी काडतूसासह पिस्टल जप्त केले. पिस्टल प्रकरणी पोलीसांंनी तपास केला असता ही पिस्टल अनिल सुभाष जाधव याच्याकडून विकत घेतल्याचे आढळून आले. अनिल जाधव (२२) हा खारबाव रेल्वे फाटकाजवळ रहात होता.त्यास पोलीसांनी रविवारी अटक केली आहे. तो मुळचा धुळे जिल्ह्यातील जुनी सांगवी येथे रहाणारा आहे. या दोघांना सोमवारी रोजी भिवंडी कोर्टात हजर केले असता कोर्टाने दोघांना बुधवार २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील आरोपी अभिजीत पाटील हा शिक्षण घेत असुन अनिल जाधव हा इलेक्ट्रीकशियन आहे.
यापुर्वी पोलीसांनी खारबाव गावातून सतीश सुभाष दुभलकर (२२)व ऋ षिकेश अरूण काठे(२२)या दोन तरूणांना अटक केली आहे. ते खारबाव गावातील रहाणारे आहेत. सतीश हा व्यवसायाने मॅकेनिक असून त्याचा साथीदार ऋषिकेश हा त्याच्याबरोबर मदतीला होता. खारबाव गावातील चायनिजच्या गाडीवर ते दोघे येणार असल्याची खबर येणार असल्याची खबर मिळाल्यानुसार पोलीसांनी सापळा लावून त्यांना ५ नोव्हेंबर सोमवार रोजी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक देशी पिस्टलासह ११ काडतूसे पोलीसांनी जप्त केली आहेत. लागोपाठ झालेल्या या घटनेने परिसरांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. भिवंडी तालुका पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरिक्षक विलास चौगुले यांच्या मार्गदर्शनाने पो.हवा.प्रशांत बडगे,पो.ना.अनिल महाजन,पो.ना.कैलास वाढविंदे,पो.कॉ.जयेश मुकादम या पथकाने कामगिरी बजावली.

Web Title: The shopkeepers along with the pistol in Kharbaw are also arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.